Ambadas Danve उद्या सभागृहात येणार?

86
Legislative Council : शिवीगाळ करूनही दानवेंची माफी नाहीच!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. अंबादास दानवेंच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहे. दानवेंच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यानंत हा निर्णय घेण्यात आला आहे.अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती.

अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात करावी

अंबादास दानवेंच्या (Ambadas Danve) निलंबनांच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. दानवे यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा निलंबन कालावधी तीन दिवस करत आहोत. उद्यापासून अंबादास दानवे सभागृहात असतील. असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार

निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, मला असं वाटतं की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर त्यांनी केला आहे. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही . मी दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले. उद्यापासून मी सभागृहात जाईल, तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. मला जरी तीन दिवस सभागृहात येऊ दिलं नाही तरी मी माझा जनता दरबार सुरू ठेवला. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे. (Ambadas Danve)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.