वसंत मोरेंचा मनसेला रामराम? राज ठाकरेंच्या सभेला जाण्यासाठी सर्व हजर; मोरे मात्र गैरहजर!

90

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी पोलिसांनी परवानगी दिली असली तरी काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत. दरम्यान राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी त्यांच्या पुण्यातील घरी मंत्रोच्चार व शंखनाद केला गेला. कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या सभेकरता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु या सगळ्यात मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे मात्र गैरहजर आहेत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )

मनसे पक्ष सोडला का?

राज ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांना विशेषत: त्यांचे पुण्यात आगमन झाल्यावर आवर्जून उपस्थित राहणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने मोरेंनी मनसे पक्ष सोडला का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केलेली नाराजी सोशल मीडियातही चांगलीच चर्चेला आली. यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून त्यांचे सहकारी साईनाथ बाबर यांच्यावर पुणे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. यामुळे वसंत मोरे नाराज झाले होते. यानंतर मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत मी मनसेसोबत आहे असे सांगितले.

अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते

परंतु आता राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार असून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत मात्र याठिकाणी वसंत मोरेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे वसंत मोरेंनी मनसे पक्ष सोडला तर नाही ना असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.