Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, २९ फेब्रुवारीला दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

90
Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, २९ फेब्रुवारीला दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, २९ फेब्रुवारीला दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणी सीबीआयने समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. अखिलेश यांना गुरुवारी, 29 फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना साक्षीदार म्हणून हजर राहावे लागणार आहे; कारण हे प्रकरण अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातले आहे.

अखिलेश यादव यांच्याकडे तत्कालीन खाण मंत्रीपदाची जबाबदारीही होती. कायदेशीर खनन प्रक्रिया थांबवले गेले असताना त्यांच्यावर खाणकामाचे कंत्राट दिल्याचा आरोप होत आहे. 2016 पासून खाण घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

(हेही वाचा – Rajyasabha : राज्यसभेत भाजपकडे सर्वाधिक जागा; NDA बहुमतापासून चार पावले दूर )

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) या समन्सकडे राजकीय दृष्टिनेही पाहिले जात आहे. अखिलेश यादव यांना समन्स हे राजकीय हेतूने बजावले आहे. निवडणुकीपूर्वी सीबीआय आणि ईडी अशा पद्धतीने सक्रिय होतात, असे अखिलेश यादव यांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.