आता अजित पवारच साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार करणार उघड

आरोप करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने सोमय्या आरोप करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.

89

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी, २२ ऑक्टोबर रोजी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहेत. त्यावेळी पवार मागील २ दशकांत विकण्यात आलेल्या साखर कारखान्यांची माहिती पत्रकार परिषदेत उघड करणार आहेत. केवळ माझाच कारखाना विकलेला नाही, अशा अनेकांनी त्यांचे कारखाने विकलेले आहेत. ते कारखाने २ कोटी, ४ कोटी, १० कोटी रुपयांत विकण्यात आले आहेत, त्यांची यादीच आपण जाहीर करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्ष आरोप करणारच 

काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात…अमुकतमुक आरोप करतात. चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही अथवा दुसरे कुणी करेल, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला. पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याच्या विषयावर प्रश्न विचारला असता, जर कुणी भ्रष्टाचार केला असेल, तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल, तर तेही पुढे येतील. आरोप करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याच पध्दतीने सोमय्या आरोप करत आहेत, असेही पवार म्हणाले.

(हेही वाचा : आंदोलन करा, पण… शेतकरी संघटनांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

सर्वच राजकीय पक्षांचे उद्योगपती, बिल्डर यांनी कारखाने विकले 

त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. या प्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली आहे. यामध्ये एक – दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत, तर त्याचा जवळपास आकडा ६०-७० पर्यंत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.