गिरीश बापटांचे निधन; विजय वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजित पवारांनी सुनावले 

114

भाजपचे पुण्याचे खासदार, ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी पुण्याची पोट निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद झाला, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना चांगलेच सुनावले.

काय म्हणाले वडेट्टीवार?

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार आहोत. भाजपाने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेल.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल…राज ठाकरेंनी आधीचे केलेले सावध; व्हिडिओ व्हायरल )

अजित पवार संतापले

दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधाने केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असे लोकं म्हणतील, असे अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.