Ajit Pawar : अजित पवारांचा शिरूरमध्ये येऊन खासदार अमोल कोल्हेंविषयी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले… 

448

मागील निवडणुकीत आपण शिरूरमध्ये आलो होतो आणि डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करा असे सांगितले होते. दुसऱ्या पक्षातून त्यांना आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. मी आणि दिलीपरावांनी जबाबदारी घेतली. दिलीपरावांनी जुन्नर, खेड आणि आंबेगावची जबाबदारी घेतली. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसर ही जबाबदारी होती. त्याप्रकारे ही जागा निवडून आणली. निवडून आणल्यानंतर मलाही वाटले वक्तृत्व चांगले आहे. पुढे काहीतरी चांगले काम करेल. पण दोन वर्ष झाली आणि त्यांनी मला म्हटले ‘दादा, मला राजीनामा द्यायचा आहे’, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. शिरुर येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी म्हटले की, राजीनामा देणाऱ्या कोल्हेंनी मी म्हटले, जनतेने आपल्याला ५ वर्षासाठी निवडून दिले आणि २ वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील. असे करू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

(हेही वाचा Supreme Court : ‘नोट के बदल वोट’ आणि ‘नोट के बदल भाषण’ म्हणणारे आमदार, खासदारावर चालणार खटला)

काय म्हणाले अजित पवार? 

तुमची अडचण काय हे विचारले, तेव्हा दादा मी कलावंत आहे. माझे वेगवेगळे नाटक, सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असे त्यांनी म्हटले. मी खोटे बोलणार नाही. जे काही समोरासमोर करेन. मी कोल्हेंना म्हटले असे करू नका. दिसायला खराब दिसते त्यावर मी सेलिब्रिटी आहे. लोकांना वाटते मी रोज मतदारसंघात यावे कसे शक्य आहे? मला माझी मालिका असते, त्याठिकाणी काम करावे लागते. मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते असे अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले. तर पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणले, तूच समजावून सांग…राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे. हेमा मालिनी, सनी देओल, गोविंदा, धर्मेंद्र असे अनेक कलाकार निवडणुकीत उभे राहतात. यांचा राजकारणाची काय संबंध आहे. अमिताभ बच्चन यांनाही एकदा उभे केले होते. शेवटी त्या भागातील विकासकामे करण्याची आवड आहे का हे पाहायला हवे. यात आमचीही चूक आहे. कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही असे सांगत अजित पवारांनी (Ajit Pawar) कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केल्याचे कबूल केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.