ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांना धक्का: जळगावात दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार Ajit Pawar गटात

109
ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांना धक्का: जळगावात दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार Ajit Pawar गटात
ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांना धक्का: जळगावात दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार Ajit Pawar गटात

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेला मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) आणि ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करून धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत कोण कोण खेळणार?)

यामध्ये माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत असलेल्या डॉ. पाटील यांनी पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवार गटात सामील होणार आहेत. दुसरीकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांचा अजित पवार गटातील प्रवेश काही महिन्यांपासून रखडला होता. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. जळगाव जिल्हा बॅंकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, यात देवकर यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.

डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) आणि गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांचा जळगावात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला स्थानिक निवडणुकांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. याउलट, अजित पवार यांच्या गटाला जळगावात नवे बळ मिळणार आहे. ठाकरे गटानंतर शरद पवार गटातील ही मोठी फूट जळगावच्या राजकारणात नवे वळण आणणारी ठरू शकते. या बदलांचा परिणाम स्थानिक राजकारणावर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.