CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दम देताच राऊतांनी गुंडांसोबतचे फोटो टाकणे केले बंद; काय म्हणालेले मुख्यमंत्री?

रविवार, ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी सज्जड दम दिल्यानंतर सोमवारी राऊतांनी फोटो टाकणे बंद केले.

590

सततच्या गोळीबाराच्या घटनांमुळे राज्यात गुंडांचे राज्य आहे आणि त्या गुंडांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सांभाळतात, असा आरोप करत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी ६ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुंडांचे फोटो दररोज ट्विट करण्यास सुरुवात केली. मात्र रविवार, ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी सज्जड दम दिल्यानंतर सोमवारी राऊतांनी असे फोटो टाकणे बंद केले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे? 

संजय राऊत यांनी आजवर ७ फोटो ट्विट केले आहेत. त्यावर एकनाथ शिंदे गटाकडून प्रतिकिया दिली जात नव्हती. अखेर रविवारी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘माझ्यावर उठसुठ आरोप करत आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काडी फिरवली की तुमची लंका जळून खाक होईल. माझ्या नादाला लागू नका. मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर दौऱ्यावर असताना दम  दिला.  याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मला बोलायला लावू नका तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असे म्हटले होते.

(हेही वाचा : Gyanvapi Case : हे पहा पुरावे… ज्ञानवापी हे हिंदूंचे मंदिरच!)

संजय राऊत बॅकफूटवर

यानंतर सलग दररोज मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करणारे संजय राऊत यांनी सोमवारी, १२ फेब्रुवारी चक्क फोटो टाकला नाही. त्यांनी फोटो टाकणे थांबवले. यावर माध्यमांनी राऊतांना विचारणा केली असता त्यांनी ‘मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणतात त्यांची दाढीची काडी लंका जाळून टाकेल, दाढी रावणाला होती’, असे प्रत्युत्तर देत आपण आज फोटो टाकला नाही, असे राऊत म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.