राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे पहिले ट्वीट, म्हणाल्या…

81

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै, सोमवारी राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी भारताचे सरन्यायधीश रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना ही शपथ दिली असून त्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी सर्वोच्च पद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिले ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी मंगळवारी, कारगिल दिवस असल्याने कारगिल युद्धातील शहीद शूरवीर, जवानांना अभिवादन केले आहे.

काय केले ट्वीट

देशभरात दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये असे लिहीले की, “कारगिल विजय दिवस हा आपल्या सशस्त्र दलांच्या असामान्य शौर्याचे, पराक्रमाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी नमन करते. तमाम देशवासी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सदैव ऋणी राहतील. जय हिंद!”

(हेही वाचा – President Oath Ceremony : 25 जुलै रोजीच का होतो भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी?)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कारगिल दिवसावर ट्वीट केले आहे. कारगिल विजय दिवस हे भारत मातेच्या अभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. या निमित्ताने मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रम गाजवणाऱ्या देशाच्या सर्व वीर सुपुत्रांना माझा सलाम. जय हिंद!, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.