आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौ-यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

96

आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा घेत आहेत. या यात्रेदरम्यान, ते सध्या औरंगाबादच्या दौ-यावर आहेत. पैठण येथील मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. आदित्य ठाकरे तेथे दाखल होताच शिवसैनिकांनी एकच गोंधळ सुरु केला. या गर्दीतून मार्ग काढत असताना, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यकर्त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवरही कार्यकर्ते भडकले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती; नितेश राणेंचा गंभीर आरोप )

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने, औरंगाबादमधील शिवसेनेला तडा गेला. औरंगाबाद दौ-याआधी आदित्य ठाकरे हे नाशिक, ठाणे, भिवंडी येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.  तसेच, आदित्य ठाकरे शुक्रवारी वैजापूर, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला तर शनिवारी, पैठण, गंगापूरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण मतदार संघात सदर प्रकार घडला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.