Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख; चर्चांना उधाण

वराडामध्ये कोळसा उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण आणि पिकांची हानी संदर्भात ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. नांदगाव परिसरात स्थानिक गावकऱ्यांनाही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) भेटणार आहेत.

252
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख; चर्चांना उधाण

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बॅनरबाजी हा एक राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या एका बॅनरवरील मजकुरामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सोमवार २२ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुप्रीया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर्स झळकल्याचं पाहायला मिळालं होतं. अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता आदित्य ठाकरे यांचंही नाव जोडलं गेलं आहे.

(हेही वाचा – Election Commission of India : बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क; बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा)

नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ मनसर येथे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ‘राज्याचे भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत. नागपूरमधील उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) भावी मुख्यमंत्री म्हणून झळकावण्यात आलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे अवघ्या काही तासांचा नागपूर दौरा करणार आहेत. नागपूर दौऱ्यात आदित्य ठाकरे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पारशिवनी तालुक्या अंतर्गत वराडा आणि नांदगाव परिसरात भेट देणार आहेत.

हेही पहा – 

वराडामध्ये कोळसा उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण आणि पिकांची हानी संदर्भात ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. नांदगाव परिसरात स्थानिक गावकऱ्यांनाही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) भेटणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.