Election Commission of India : बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क; बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा

यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Election Commission of India) ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.

33
Election Commission of India : बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क; बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा

देशात गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदानात (Election Commission of India) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाय केले जातात. अशातच बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. त्या नवीन तंत्राची सध्या तपासणी सुरु आहे.

(हेही वाचा – Jayant Patil ED : जयंत पाटील यांची ‘ईडी’ चौकशी; राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा)

मतदानाची खूण (Election Commission of India) म्हणून डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याची पद्धत आहे. मात्र आता मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याची पद्धत आहे.

हेही पहा – 

यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Election Commission of India) ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा (Election Commission of India) वापर कालबाह्य होऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.