Masjid : उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदींवरील शेकडो भोंग्यांवर कारवाई

78

उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात मोहीम राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील (Masjid) भोंग्यांवर कारवाई करण्यात आली. यात नियमापेक्षा अधिक मोठा आवाज ठेवणे, अनुमतीविना भोंगे लावणे आदी गोष्टी समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. यात शेकडो भोंगे जप्त करण्यात आले आहेत.

या मोहिमेचा प्रारंभ २७ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजल्यापासून करण्यात आला. लक्ष्मणपुरीतील तकियावाली मशिदीसमवेत (Masjid) अनेक भागांतील नियमभंग करणार्‍या मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले. अशा प्रकारे कानपूर, हमीपूर, चित्रकूट, अयोध्या आदी जिल्ह्यांमध्येही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी न्यायादंडाधिकारीही उपस्थित होते.

(हेही वाचा Raj Thackeray : बाळासाहेबांचे विचार असे म्हणता, मग मराठी पाट्या आणि मशिदींवरील भोंग्यावर का निर्णय होत नाही; राज ठाकरेंनी सरकारला सुनावले)

प्रतापगड जिल्ह्यात ३५० मशिदींवर (Masjid) बेकायदेशीरित्या भोंगे लावण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद केले आहेत. कौशांबी जिल्ह्यामध्ये २०३ ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले. तसेच काही मशिदींच्या ठिकाणी वीज चोरी करण्यात आल्याचेही या वेळी उघडकीस आले. फारूखाबाद जिल्ह्यात ४६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यासह ललितपूर, कन्नौज, फतेहपूर आणि औरेया या जिल्ह्यांमध्येही कारवाई करण्यात आली.

काही जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षकांनी मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांसमवेत बैठक घेतली. यात त्यांना सरकारी नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले. मशिदींप्रमाणेच काही मंदिरे आणि मठ येथील नियमभंग करणार्‍या भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.