Abu Azmi : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमींना पुळका

वॉरंट’ न देता अटक झाली म्हणून विधानसभेत केली आरडाओरड

201
Abu Azmi : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमींना पुळका
Abu Azmi : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमींना पुळका

राष्ट्रविघातक कारवायांमध्ये गुंतत असलेल्या मुसलमान युवकांचे प्रबोधन करण्याऐवजी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी अशा आरोपींना ‘वॉरंट’ न देता अटक झाली म्हणून विधानसभेत चक्क आरडाओरड केली. सोमवार, दि. ११ डिसेंबर रोजी पॉईंट ऑफ इनफॉर्मेशनच्या आयुधाचा वापर करीत त्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. (Abu Azmi)

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी, मात्र कारवाई करताना कोणत्याही प्रकारे समन्स किंवा अटक वॉरंट देण्यात आले नाही. कारवाई करतांना पोलिसांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याचा पुळका अबू आझमी (Abu Azmi) यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी (Abu Azmi) यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. (Abu Azmi)

(हेही वाचा – Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती; हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका)

लांडगे म्हणाले, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आंतकवादविरोधी पथकांनी राज्यात सर्वाधिक कारवाया पुणे येथे केल्या आहेत. जुलै महिन्यात पुणे येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सार्वजनिक सभेच्या १ महिना आधी अन्वेषण यंत्रणेला अतिरेकी कारवायांची माहिती मिळाली. यावेळी अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. कोंढाणा येथील एका मशिदीवर धाड टाकून अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका भूलतज्ज्ञ डॉक्टरला अटक करण्यात आली. (Abu Azmi)

अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई केवळ मुंबईमध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी या कारवाया करण्यात येत आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले. यावर अबू आझमी (Abu Azmi) यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यांकडे बोलण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अबू आझमी (Abu Azmi) यांनी आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी मुसलमानांविषयी आवाज उठवण्याऐवजी देशभक्त मुसलमानांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, असे आवाहन केले. (Abu Azmi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.