दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन विधान भवन?

95
दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन विधान भवन?

दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन विधान भवन बांधण्यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर आग्रही आहेत. ४२ वर्षांची ही इमारत जीर्ण झाल्याने दरवर्षी डागडुजीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा नवीन इमारत बांधणे उचित ठरेल, असे त्यांचे मत आहे.

सध्याच्या गोलाकार आकाराच्या विधान भवन इमारतीचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते १९८१मध्ये उद्घाटन झाले होते. त्यावेळी ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री होते. ही इमारत आता ४२ वर्षांची झाली आहे. त्यामुळे दरवर्षी काही मजल्यांवर डागडुजीचे काम करावे लागते. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाआधी या इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. तसेच तळ आणि पहिल्या मजल्याचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Tehelka : तहलका आणि तरुण तेजपाल यांनी मेजर जनरल अहलुवालिया यांना २ कोटींची नुकसान भरपाई द्यावी – दिल्ली उच्च न्यायालय)

दरवर्षी दगडुजीवर वारेमाप उधळपट्टी करण्यापेक्षा नवीन इमारत बांधल्यास अशाप्रकारे पैसे वाया जाणार नाहीत. शिवाय अत्याधुनिक सोयीसुविधानीयुक्त प्रशस्त अशी इमारत उभारल्यामुळे भविष्यात सदस्य संख्या वाढल्यानंतरही अडचणी जाणवणार नाहीत. कारण, लोकसभेच्या खासदारांप्रमाणेच राज्य विधानसभांच्या आमदारांच्या संख्येमध्ये २०२६ नंतर वाढ होऊ शकते.

विधानसभा सभागृहात अधिक आमदारांना सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. यामुळेच नवीन विधानभवन बांधण्याची मागणी पुढे येत आहे. या संदर्भातील प्रस्ताव संबंधित विभागाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. सध्याच्या विधान भवनाच्या समोरील वाहनतळाच्या जागेचा वापर नवीन इमारत उभारण्याकरिता होऊ शकतो, असे कळते.

सध्याच्या इमारतीत किती जणांना जागा?

– राज्यात विधानसभेला खालचे सभागृह (Lower House) तर विधानपरिषदेला वरिष्ठ सभागृह (Upper House) असे संबोधण्यात येते.
– विधान सभेमध्ये थेट सार्वत्रिक मतदानाव्दारे निवडून येणारे २८८ सदस्य बसतात. विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ७८ इतकी आहे.
– विधानमंडळाचे प्रशासकीय काम पाहणाऱ्या विधानमंडळ सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख प्रधान सचिव (१) असून या सचिवालयामध्ये विविध स्तरांवर काम करणारे अधिकारी व कर्मचारी एकूण ७५० इतके आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.