Ramdas Athawale : घराणेशाही मोडून लोकशाही मजबूत करणारा निर्णय; राहुल नार्वेकर यांचे रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. शिवसेनेने १९९९ मध्ये शिवसेनेचे संविधान बनविले त्यानंतर आता पुन्हा नविन संविधान बनविले. हा निकाल देतांना स्पिकर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे जुने १९९९ चे संविधान आहे. तेच संविधान स्विकारले जाणार असल्याचे सांगितले आहे.

147
Ramdas Athawale : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी या बाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेल्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तो ऐतिहासिक ठरणारा निकाल आज लागला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बुधवारी (१० जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निकाल दिला आहे. हा निर्णय नियमानुसार आणि कायदेशीर योग्य निर्णय आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत आहोत. याच निकालाची आम्हाला अपेक्षा होती. बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्री पदाचे सिंहासन अबाधित राहिले आहे. या निर्णयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा झटका बसला आहे अशी प्रतिक्रिया बुधवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रसार माध्यमांना दिली. (Ramdas Athawale)

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या नेतृत्वातील आमदारांवर पात्रतेबाबत निकाल देतांना त्या सर्वांचे सदस्यत्व अधिकृत ठरविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. शिवसेनेने १९९९ मध्ये शिवसेनेचे संविधान बनविले त्यानंतर आता पुन्हा नविन संविधान बनविले. हा निकाल देतांना स्पिकर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेचे जुने १९९९ चे संविधान आहे. तेच संविधान स्विकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. सुनिल प्रभु यांनी १६ आमदारांना निलंबीत करण्याचा जो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने निर्णय दिला होता तो निर्णय शिवसेनेच्या जुन्या संविधानानुसार त्यांनी बेकायदेशीर ठरविला आहे; रद्द केला आहे. शिवसेनेच्या जुन्या घटनेनुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकटयाला कोणत्याही आमदाराला पक्षातुन काढुन टाकण्याचा, निलंबित करण्याचा पक्ष प्रमुख म्हणून अधिकार नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे उध्दव ठाकरेंनी नियुक्त केलेले व्हीप सुनिल प्रभु हे अनधिकृत व्हीप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नियुक्त केलेले व्हीप भरत गोगवले हेच खरे शिवसेनेचे व्हीप असल्याचा निकाल स्पिकर राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे. (Ramdas Athawale)

(हेही वाचा – Child Development Centers : राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र)

निकाल लोकशाही नुसार न्याय्य; नियमानुसार योग्य – आठवले 

या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला फार मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना अधिकृत ठरणारा आजचा निकाल स्वागतार्ह निकाल आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) या निर्णयाचा महायुतीला प्रचंड फायदा होणार आहे. लोकसभेमध्ये ४५ पेक्षा जास्त महाराष्ट्रात खासदार निवडुन आणण्याचा आमचा निर्धार आहे. तो निर्धार या निकालाने नक्कीच पूर्ण होईल. यापूर्वी निवडणुक आयोगाने सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shiv Sena) हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. त्यानुसार त्यांना शिवसेनेच निवडणुक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह ही देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे ३७ आमदार असल्यामुळे बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला होता. त्यानुसार महाराष्ट्राचे स्पीकर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सुध्दा बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. हा निकाल लोकशाही नुसार न्याय्य; नियमानुसार योग्य निकाल आहे. लोकशाही मजबुत करणारा निकाल आहे. घराणेशाही ऐवजी लोकशाहीला बळ देणारा हा ऐतिहासिक निकाल आहे असे मत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे. या निकालाबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे अभिनंदन केले आहे. (Ramdas Athawale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.