उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचं नाव न घेता व्यंगात्मक गाणं आणि गाण्यात गद्दार उल्लेख केल्याप्रकरणी कुणाल कामरा (Kunal Kamra) विरोधात चार गुन्हे दाखल आहेत. गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराने रीट याचिका केली होती. मात्र गुन्हे रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Kunal Kamra)
मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. तसेच कुणाल कामराचा जबाब चेन्नई मध्ये नोंदवण्याचे मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. (Kunal Kamra)
हेही वाचा- Pahalgam Terror Attack : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांच्या घरात स्फोट ; काय आहे पहलगामशी संबंध ?
माझ्यावरील कारवाई म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन तसेच संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन असल्याचा दावा कामराच्या याचिकेत होता. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. (Kunal Kamra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community