नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद – मंगलप्रभात लोढा

133
नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद - मंगलप्रभात लोढा
नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद - मंगलप्रभात लोढा

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नाशिकच्या भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी दिली.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोढा म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर, जिल्हा नाशिक येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने याकरिता पुढाकार घेतला असून, वीर सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.

(हेही वाचा – ‘त्या’ जाहिरातीवरून नितेश राणेंचे राऊतांवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले, तुझ्या…)

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती लोढा यांनी दिली.

शिवरायांची युद्धनीती अभ्यासात येणार

  • शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे.
  • बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.