महाविकास आघाडीचा मोर्चा महाविकास आघाडीच्याच विरोधात

157

भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली असे समजून त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे. महाविकास आघाडी मुळातच एक गौडबंगाल आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग करुन सेक्युलर गटात प्रवेश केला आणि म्हणून महाविकास आघाडीची स्थापना झाली. यासाठी ठाकरेंना खूप मोठा त्याग करावा लागला आहे. आपल्या पिताश्रींना हिंदुत्ववादी जनतेने दिलेली हिंदुह्रदयसम्राट ही पदवी काढून टाकावी लागली. संभाजी ब्रिगेड सारख्या जातीयवादी आणि हिंदू द्रोही गटासोबत युतीची घोषणा करावी लागली. सुषमा अंधारे यांच्या सारख्या हिंदूंचा द्वेष करणार्‍या, हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणार्‍या, हिंदूंच्या देवी-देवतांची, संत-महात्म्यांची टिंगल टवाळी करणार्‍या महिलेला पक्षात सहभागी करुन नेता करावं लागलं. असे अनेक त्याग उद्धव ठाकरेंनी केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी जो वैचारिक गड निर्माण केला होता, त्या गडाला सुरुंग लावून उध्वस्त केलं आणि त्यातून महाविकास आघाडीची निर्मिती झाली.

( हेही वाचा : वीर सावरकर कराटे अ‍ॅकेडमीच्या नारायणी आणि कशिशने जिंकले सुवर्णपदक!)

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. शिवसेनेच्या पक्षाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून ठेवण्यात आलं आहे. परंतु शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशा प्रकारची कामे ठाकरेंनी केली आहेत. एका वडापावला शिव-वडापाव म्हटलं गेलं, शिवसैनिक म्हणवून घेणारा कार्यकर्ता शिवाजी महाराजांना नको असलेली कामे करु लागला, हातात गडत घेऊन दुकाने तोडू लागला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती कष्ट घेतले, जीवावर बेतेल असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. उद्धव ठाकरे मात्र जेव्हा जनतेला गरज होती तेव्हा घरात बसले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामनय जनतेला त्रास दिला. महाराज रयतेचं रक्षण करायचे. संजय राऊत घाणेरड्या भाषेत बोलू लागले, भ्रष्टाचार वाढला, दाऊद इब्राहिमशी संगनमत असलेल्या लोकांना समर्थन देऊ लागले, १०० कोटींची वसुली होऊ लागली. हे सर्व कार्य म्हणजे महाराजांचा अपमान होय! त्यामुळे सर्वात आधी त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदललं पाहिजे.

कॉंग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. महाराजांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. राष्ट्रवादीची वेगळी अवस्था नाही. राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांविरोधात आहे. या लोकांनी जातीयवादी संघटनांना समर्थन दिलं. सावरकरांवर गलिच्छ आरोप केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून लोकांमध्ये तणाव निर्माण केला. प्रतापगडवरील अफझलखानाच्या धडग्याचे अतिक्रमण झाले. ते शिंदे-फडणवीसांनी उखडून टाकले. महाविकास आघाडीला का उखडता आले नाही. जितेंद्र आव्हाड महाराजांची कमी आणि अफझलखानाचीच जास्त स्तुती करत असतात, तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का? महाराजांना जाणता राजा म्हणू नये असं वक्तव्य पवार करतात तेव्हा अपमान होत नाही का? या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाविरोधात आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान महाविकास आघाडीनेच केला असून हा मोर्चा त्यांनी स्वतःच्याच विरोधात काढला आहे का? असा प्रश्न आपल्याला पडतो. उलटा चोर ही कोतवाल को ड़ाटे असा प्रकार झाला.

महाविकास आघाडी गर्दी जमवण्यात जरी यशस्वी झाली असली तरी जनता येणार्‍या निवडणुकीत दाखवून देईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर महाविकास आघाडीनेच केला आहे आणि बहुसंख्य मतांनी त्यांचा पराभव होईल. जनतेला मूर्ख बनवणे आता सोपं राहिलं नाही. जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषी खूप आदर आहे. हे ढोंगी राजकारणी तर महापुरुषांच्या वापर करुन घेतात. पण जनता त्यांचे मनापासून पूजन करते. त्यामुळे जनताही लवकरच मोर्चा काढणार आहे. आधी पलिकेच्या निवडणुकीत आणि नंतर राज्याच्या निवडणुकीत जनता रस्त्यावर उतरेल आणि महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवेल. तोच खरा महामोर्चा ठरेल!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.