Curd : शुभ कार्याआधी दही साखर खाण्यामागील काय आहे वैज्ञानिक कारण?

106

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही (Curd) साखर देण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जर खाण्यासाठी दही साखर दिली तर ते शुभ मानले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का या प्रथेमागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे.

दही (Curd) हे अन्न पचवण्यास मदत करते. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शियम, व्हिटामिन बी २, बी १२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवतात. साखरेत कार्ब्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मेंदूमध्ये रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड असणे खूप गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार दही (Curd) शरीरात असणारी उष्णता कमी करण्यास मदत करते; याशिवाय साखर शरीराला ग्लुकोज पुरवते. जर आपण दही साखर एकत्र खाल्ली तर शरीर थंड राहण्यास मदत करते आणि यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.

(हेही वाचा Ganeshotsav 2023 : वीर सावरकरांच्या सहभोजन संकल्पनेचे स्मरण करुन देणारा ‘वसईचा राजा’चा उपक्रम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.