Whatsapp चे नवीन Update: हजार जणांचा ग्रुप, एकाच वेळी करा इतक्या जणांना व्हिडिओ कॉल

125

Whatsapp ने आपल्या युजर्ससाठी मोठी खूशखबर दिली आहे. व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणले असून यामुळे आता एकाच वेळी 32 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होणा-या सदस्यांची संख्या देखील वाढवण्यात आली असून आता 1 हजार 24 जणांचा ग्रुप बनवता येणार आहे.

मार्क झुकरबर्ग यांची घोषणा

याआधी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलमध्ये केवळ 8 जण सहभागी होऊ शकत होते. ही मर्यादा वाढवून आता 32 इतकी करण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांची आधीची संख्या 512 होती ती वाढवून आता 1 हजार 24 इतकी करण्यात आली आहे. व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

(हेही वाचाः T-20 World Cup मध्ये नवा ट्विस्ट, ICC ने बदलले सेमी फायनल आणि फायनलसाठीचे नियम)

कम्युनिटी ग्रुप फीचर

तसेच नव्या फीचरनुसार व्हॉट्सअप युजर्सना आता कम्युनिटी ग्रुप फीचर देण्यात आले आहे. यामुळे आता युजरला वेगवेगळे ग्रुप तयार करण्याची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेल्या सदस्यांची कम्युनिटी तयार केली की तो मेसेज इच्छित युजरला पाठवता येणार आहे.

2 जीबीपर्यंत डेटा शेअरिंग

इन-चॅट पोलची सुविधा देखील युजर्सना देण्यात आली आहे. याद्वारे ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नाबाबत आपले मत मागवू शकतात. तसेच एकाच वेळी युजर्स 2 जीबी पर्यंत डेटा म्हणजेच फोटो,व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू शकणार आहेत. व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर ही फीचर्स आपल्याला वापरता येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.