-
ऋजुता लुकतुके
सतत वर चढत असलेल्या सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये शुक्रवारी मामुली घसरण पाहायला मिळाली आहे. बुलियन बाजार बंद होताना २४ कॅरेट सोनं ९५,६६९ रुपयांवर ट्रेड करत होतं. गुरुवारी सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी ९६,२८६ रुपये इतकी होती. तर चांदीच्या दरातही १२१ रुपयांची मामुली घसरण झाली आहे. १ किलोमागे चांदीचा दर आता ९७,५१३ रुपये इतका झाला आहे. याच महिन्यात २१ एप्रिल रोजी सोन्याच्या दराने महाराष्ट्रात १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र काहीशी घसरण या मौल्यवान धातूत पाहायला मिळाली आहे. (Todays Gold Rate)
(हेही वाचा – Top 5 EVs in India : जाणून घेऊया देशातील लोकप्रिय पहिले पाच इलेक्ट्रिक कारचे ब्रँड)
मुंबई आणि देशातील चार मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर किती आहेत ते तपासून पाहूया :
दिल्ली : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,३४० रुपये आहे.
मुंबई : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,२४० रुपये आहे.
कोलकाता : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,२४० रुपये आहे.
चेन्नई : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,२४० रुपये आहे.
भोपाळ : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,१०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,२९० रुपये आहे. (Todays Gold Rate)
(हेही वाचा – Tesla Cyber Truck in India : भारतात पहिला टेस्ला सायबर ट्रक दाखल, गुजरातच्या एका व्यापाऱ्याने घेतला विकत )
सोन्यासाठी आता पुढील महत्त्वाचा मूहूर्त असेल तो अक्षय्य तृतीयेचा. यंदा ३० एप्रिलला हा सण साजरा होत आहे. या सणाला सोनं खरेदी करणं शुभ मानत असल्यामुळे पुन्हा एकदा सोन्यात उसळी पाहायला मिळू शकते.
सोनं खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन रिझर्व्ह बँक आणि केंद्रसरकारकडून वारंवार होत असतं. प्रमाणित सोनं म्हणजे हॉलमार्क असलेलंच सोनं खरेदी करण्याचा, तसंच सोन्याची किंमत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनवर तपासून पाहण्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे सोन्यासाठी रोख पैसे न मोजता डिजिटल पेमेंट किंवा युपीआयच्या माध्यमातून खरेदी करण्याचं सरकारकडून नेहमी केलं जातं. (Todays Gold Rate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community