Heat Wave : वाढत्या उष्णतेचे होतायेत नकारात्मक परिणाम; कोणते आजार वाढले?

ढत्या उष्णतेचा सर्वांत जास्त नकारात्मक परिणाम शरीरातील पचन संस्थेवर होतो. त्यामुळे जर खाण्यावर आणि खाण्याच्या वेळेवर नीट लक्ष दिले नाही तर शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल.

255

राज्यभरात वाढत्या उष्णतेचे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. कधी तापमानात अचनाक वाढ होते आहे, तर कधी तापमान अचानक खाली पडते आहे. यामुळे त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, पोटदुखीसारखे त्रास उद्भवतात. उष्ण आणि दमट वातावरणात झालेल्या आकस्मित बदलामुळे महिला आणि लहान बालकांमध्ये एका विशिष्ट रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते.

यूटीआय

उन्हाळ्याच्या चार – पाच महिन्यांत सतत बदलणाऱ्या उष्ण आणि आर्द्र हवामानामुळे हा त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतेक वेळा महिलांना यूटीआय संसर्ग झाल्याचे दिसून येते. मूत्रमार्गाच्या भागातील संसर्गला यूटीआय असे म्हणण्यात. लघवी करताना जळजळ, लघवीतून रक्त येणे, ओटीपोटात सतत वेदना होणे, मळमळ होणे, उलट्या होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

(हेही वाचा Muslim : लातूरमध्ये हिंदू जोडप्याला मारहाण करून मशिदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न)

कशामुळे हा त्रास होतो?

  • युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी याबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, उन्हाळ्यातील प्रवास किंवा पाण्यात पोहण्यामुळे यूटीआयची प्रकरणे वाढतात.
  • यूटीआयसह त्वचेवर चट्टे उमटणे, दाह होणे, अंग लाल होणे, पुरळ येणे यासारखे त्वचेचे विकार नागरिकांना जडत आहेत.

पचन संस्थेवर परिणाम

वाढत्या उष्णतेचा सर्वांत जास्त नकारात्मक परिणाम शरीरातील पचन संस्थेवर होतो. त्यामुळे जर खाण्यावर आणि खाण्याच्या वेळेवर नीट लक्ष दिले नाही तर शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. मसालेदार, तळलेले, तेलकट पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अपचन, पोट बिघडणे, पोटदुखी सारख्या अनेक तक्रारी उद्भवतात. आहारात काही साधे बदल केले तर या सारख्या त्रासापासून मुक्तता होईल.

  • साधा पौष्टिक आहार
  • कमी तेलाचे पदार्थ
  • भरपूर पाणी
  • फळांचे सेवन
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.