Electric Bus : ई – बसच्या प्रतीक्षेला पूर्णविराम कधी मिळणार?

यार केलेल्या आराखड्यानुसार मार्च २०२३ पर्यंत ५० डबल डेकर बस आणि डिसेंबर २०२३ च्या आत ७०० डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र हे नियोजन आता कागदावरच राहाणार आहे

152

वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न सरकार त्याच्या ताकदीने करत आहे. त्यात नवीन स्थानकाची उभारणी करणे, रस्ते बांधणे, पूल बांधणे यांचा समावेश होतो. पण मुंबईत सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची इच्छा वास्तवात उतरताना दिसत नाही. आरामदायी असलेल्या एकूण ९०० इलेक्ट्रिक डबर डेकर बसगाड्यांपैकी ७०० हून अधिक गाड्या काही महिन्यांपूर्वी सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत त्यातील फक्त २ बस दाखल झाल्या आहेत.

नियोजन उत्तम पण अमंलबजावणी?

देशातल्या पहिल्या डबल डेकर एसी बसचे उद्घाटन मागच्या वर्षी मुंबईत करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑगस्ट २०२२ मध्ये दोन डबल डेकर एसी बसचे उद्घाटन करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये उद्घाटन झाले, मात्र बस रस्त्यावर दिसली ती २१ फेब्रुवारी २०२३ नंतर. तयार केलेल्या आराखड्यानुसार मार्च २०२३ पर्यंत ५० डबल डेकर बस आणि डिसेंबर २०२३ च्या आत ७०० डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र हे नियोजन आता कागदावरच राहाणार आहे असे सामान्य प्रवाशांना वाटत आहे. कारण १३ मे २०२३ पर्यंत फक्त २ एसी डबल डेकर बस सेवेत दाखल झाल्या आहेत.

(हेही वाचा Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणूक : जनतेचा कौल कोणाच्या बाजूने?)

विलंब कोणामुळे?

बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनीला उशीर होत असल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. त्या कंपनीला २०० बस पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यातही कंपनी अयशस्वी झाली आहे. उरलेल्या ७०० एसी बसच्या निविदांसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्याचे समोर आले आहे. पहिल्या वेळेस फक्त एकच निविदा दाखल झाली. त्यामुळे निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ८ मेपर्यंत वाढवण्यात आली. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.