Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती केसांचं तेल वापरून पाहा

घरच्या घरी तेल तयार करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

127
Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहा
Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहा

पावसाळ्यात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका असतो. यासोबत केसांच्या समस्याही खूप वाढतात. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटणे यामुळे बहुतेक जण त्रस्त असतात. तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि प्रोडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करुन पाहा.

पावसाळ्यात आरोग्यासोबतच केसांची योग्य काळजी आणि निगा राखणेही आवश्यक आहे. पावसाळा ऋतूमध्ये केस गळण्याची समस्या सामान्य आहे. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी तेल तयार करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तुम्हीही आयुर्वेदिक पद्धतींनी तुमचे केस मजबूत करु शकतात आणि ते ही घरी.

भृंगराज कडुनिंब तेल

1 कप नारळाचं तेल
2 कप तीळ तेल
1/2 कप एरंडेल तेल
4 चमचे ब्राह्मी पावडर
3 चमचे भृंगराज पावडर
7 ते 8 कडुलिंबाची पाने ठेचून
7 ते 8 कढीपत्ता पाने ठेचून किंवा चूर्ण
1 टीस्पून मेथी दाणे
2 चमचे आवळा पावडर
4 जास्वंदाची फुले
2 दोन चमचे मेथी दाणे

तेल तयार करण्याची पद्धत

तेल बनवण्यासाठी सर्वात आधी जाड तळ असलेली कढई घ्या आणि गॅसवर ठेवा. यासाठी लोखंडी कढई घेतल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
आता यात खोबरेल तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल घालून थोडा कोमट होऊ द्या. आता यामध्ये मेथी दाणे घाला.
त्यानंतर इतर सर्व साहित्य एक-एक करून तेलात टाका.
मंद आचेवर हे तेल 10 मिनिटे ठेवा.
तेलाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा.
आता हे तेल गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.
केसांच्या समस्येवर रामबाण उपाय असणारं घरगुती केसांचे तेल तयार आहे.

तेल वापरण्याची पद्धत

हे तेल वापरण्याआधी डबल बॉयलर पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतर केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर किमान 45 मिनिटे ते एक तास हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शॅमपूने केसं धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता, त्यानंतर सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा.

(हेही वाचा : Mukesh Ambani : शेअर बाजारातील भरभराटीमुळे उद्योगपतींची संपत्तीही वाढली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.