Food Habbits : रोज दह्याचे सेवन केले पाहिजे का ? जाणून घ्या… 

जास्त प्रमाणात दह्याचे सेवन केल्यास कॅलरीजचे प्रमाण अतिजास्त होऊन साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे अति प्रमाणात दही न  खाता संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

91
Food Habbits : रोज दह्याचे सेवन केले पाहिजे का ? जाणून घ्या... 
Food Habbits : रोज दह्याचे सेवन केले पाहिजे का ? जाणून घ्या... 

दही खायला अनेकांना आवडते. (Food Habbits) जेवण, स्नॅक्स व गोड पदार्थांची चव ते आणखी वाढवते. दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. त्यात प्रो-बायोटिक्स, प्रोटिन्स आणि आणखी महत्त्वाचे पोषण घटकदेखील आहेत. पण रोज दह्याचे सेवन केले पाहिजे का ? जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात दह्याचा समावेश केला, तर तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ? (Food Habbits)

तज्ञ सांगतात, “रोज दही खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे असू शकतात. हा प्रो-बायोटिक्सचा चांगला स्रोत आहे; जो आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. त्याचबरोबर त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटिन्स आणि महत्त्वाची व्हिटॅमिन्सही असतात. दह्यामध्ये फक्त व्हिटॅमिन डी हे एकच व्हिटॅमिन नसते. हाडे आणि दात यांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची; तर स्नायूंच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रोटिन्सची मदत होते. दह्यामध्ये व्हिटॅमिन बी चयपचय (Metabolism) व ऊर्जा निर्माण करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते.” (Food Habbits)

(हेही वाचा – Mumba Devi Temple Car Parking : मुंबादेवी मंदिरा जवळील वाहनतळाची जागा बदलणार)

ज्यात साखर किंवा कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर नसेल, असे साधे दही खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. पोषक घटकांचे सेवन करण्यासाठी फक्त दह्यावर अवलंबून राहू नका. तुमच्या आहारात नियमित बदल करत राहा. तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असेल तर दही खाणे, टाळा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जास्त प्रमाणात दह्याचे सेवन केल्यास कॅलरीजचे प्रमाण अतिजास्त होऊन साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे अति प्रमाणात दही न  खाता संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. (Food Habbits)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.