-
ऋजुता लुकतुके
चीनच्या शिओमी ही कंपनी आपले स्वस्तातील फोन रेडमी या ब्रँडखाली बाजारात आणते. रेडमीने या स्वस्तात मस्त फोनमध्येही मॉडेलची संख्या झपाट्याने वाढवायला सुरुवात केली आहे. आता रेडमी ए५ हा फोन अधिकृतपणे बाजारात दाखल झाला आहे. फोनचा डिस्प्ले एचडी आहे. तर यातील चिपसेट युनिजनचा आहे. अँड्रॉईड १५ या प्रणालीवर आधारित या फोनमध्ये ५,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. (RedMi A5)
सध्या रेडमी ए५ फोन दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिला फोन ३ जीबीची रॅम व ६४ जीबीचं स्टोरेज असलेला तर दुसरा फोन ४ जीबी रॅम व १२८ जीबीचं स्टोरेज असलेला आहे. दोन्हीच्या किमती अनुक्रमे ६,४९९ व ७,४९९ रुपये अशा आहेत. भारतात हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईट तसंच ॲपवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर एमआय डॉट कॉम या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरही या फोनचं बुकिंग करता येईल. पाँडेचेरी ब्लू, जस्ट ब्लॅक आणि लेक ग्रीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. (RedMi A5)
(हेही वाचा – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तगत हिंगोलीतून ८०० भाविक रामललाच्या भेटीला Ayodhya कडे रवाना)
Win a REDMI A5! 🎉 Can you believe it’s this easy? 😍
1️⃣ Share this post on your page.
2️⃣ Drop a comment saying “Done” with the hashtag #RedmiA5ShareAndWin.That’s it! We’ll randomly pick a lucky winner to take home the amazing REDMI A5! 🥳#RedmiA5ShareAndWin pic.twitter.com/ZMvRd7Pkqj
— Xiaomi Nigeria (@XiaomiNigeria) April 16, 2025
रेडमी ए५ फोनचा डिस्प्ले ६.८ इंचांचा आहे आणि रिफ्रेश रेट १२०० हर्ट्झचा आहे. डिस्प्लेच्या प्रखरतेला ऱ्हाईनलँड कंपनीचं सर्टिफिकेशन आहे. फोनचा प्रोसेसर ऑक्टा कोअर युनिसॉक टी७२५० हा आहे आणि फोनचं स्टोरेज युएसबी कार्ड वापरून २ टेराबाईटपर्यंत वाढवता येणार आहे. फोनला अँड्रॉईडकडून २ वर्षांचे अपडेट्स मिळणार आहेत. तसंच ४ वर्षं सुरक्षाविषयक अपडेटही मिळणार आहेत. (RedMi A5)
फोनचा कॅमेरा ३२ मेगा पिक्सेलचा आहे. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा आहे. फोनची तगडी बॅटरी हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ५,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅटचा वायरलेस चार्जर फोनबरोबर येतो. (RedMi A5)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community