पॉवरलिफ्टर सुश्मिता देशमुखने सुवर्णपदक पटकावत केला राष्ट्रीय विक्रम!

97

ठाण्यातील विटाव्यात राहणारी पॉवरलिफ्टर चॅम्पियन सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळ येथील अल्लापुझा येथे पार पडलेल्या सब ज्युनीअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपद जिंकले. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कल्याणच्या कारभारी जिमची खेळाडू असलेल्या सुश्मिताने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी पताका फडकविली आहे. तिची जून 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्येही निवड झाली आहे.

आशियाई स्पर्धेमध्ये सुश्मिताची निवड

अल्लापुझा केरला येथे सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर, क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. सुश्मिता सुनील देशमुख हिने सिनियर गटामध्ये 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक तसेच नॅशनल रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान म्हणजे स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया 2022 पटकावला. जुनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये सुश्मिताची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्तरीय पॉवरलिफ्टिंग क्लासिक सब जुनियर, जुनियर-सीनियर मास्टर स्पर्धा कामगार क्रीडा भवन कल्याण मंडळ, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक 5 ते 6 मार्च2022 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातून 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

( हेही वाचा : मराठीचा गोडवा व परदेशी तडका! महाराष्ट्रातील ‘पोर्तुगीज’ भाषिक गावाची अनोखी कहाणी )

कल्याणच्या कारभारी जिममध्ये विनायक कारभारी यांच्याकडे सुश्मिता सराव करीत असून या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक विनायक कारभारी, वडील सुनील आत्माराम देशमुख व आई वंदना देशमुख यांना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.