Pali Hill Mumbai : पाली हिलमध्ये गेल्यावर कोणत्या दुकानातून खरेदी कराल?

65
Pali Hill Mumbai : पाली हिलमध्ये गेल्यावर कोणत्या दुकानातून खरेदी कराल?

वाचकहो, खरेदी म्हटलं की आपल्याला बेस्ट डील, सेल आणि वेगवेगळ्या ऑफर्स हव्या असतात. आपल्या खिशाला भगदाड न पाडता उत्तम खरेदी करणं म्हणजे एक टास्कच असतो. हा टास्क पूर्ण करण्यासाठी आपण चांगल्या आणि स्वस्त मार्केट्सच्या शोधात असतो. (Pali Hill Mumbai)

मुंबईत असे कितीतरी मार्केट्स खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर मार्केट, मनीष मार्केट, भायखळा मार्केट, फॅशन स्ट्रीट, दादर मार्केट, वांद्रे लिंकिंग रोड, अंधेरी मार्केट, बोरिवली स्टेशन मार्केट, नटराज मार्केट, मालाड सोमवार बाजार यांसारखे कितीतरी लहानमोठे मार्केट्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशी भरभरून खरेदी करू शकता. तसेच या मार्केट्समध्ये तुम्ही आपल्या बजेटमध्ये आवडीच्या वस्तूंची होलसेल किंवा रिटेलमध्ये खरेदी करू शकता. (Pali Hill Mumbai)

आज आम्ही तुम्हाला मुंबईतल्या अशाच एका खरेदीसाठी उत्तम असलेल्या ठिकाणाची माहिती सांगणार आहोत. त्या ठिकाणाचं नाव आहे पाली हिल्स. होय पाली हिल्स (Pali Hill) रोड हे खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पाली हिल्स येथे रस्त्याच्या कडेला काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही ट्रेंडिंग फॅशनचे कपडे, दागिने आणि फुटवेअर खरेदी करू शकता. तेही शो-रूमपेक्षा कमी किंमतीत, तुमच्या बजेटमध्ये. चला तर मग पाहुयात ती कोणती ठिकाणं आहेत ते.. (Pali Hill Mumbai)

  • डी२ कलेक्शन

तुम्हाला डेनिमच्या जीन्स पँट्स वापरायला आवडत असतील तर डी२ कलेक्शन हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला फक्त आठशे रुपयांपासून पुढे, सगळ्या साईझच्या, वेगवेगळ्या फिटिंग्जसच्या, डिझाईनच्या आणि सगळ्या रंगांच्या जीन्स मिळू शकतात. तर तुम्ही वांद्रे येथे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डी२ कलेक्शनला नक्की भेट द्या. (Pali Hill Mumbai)

  • ला ज्यूडी

जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंडी फुटवेअर वापरायला आवडत असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्गच आहे असं म्हणायला हरकत नाही. ला ज्यूडीच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला फॉर्मल, कॅज्युअल, ऑक्सफर्ड्स आणि स्निकर्स अशा सर्व प्रकारचे फुटवेअर कलेक्शन पाहायला मिळेल. (Pali Hill Mumbai)

इथल्या फुटवेअर्सची क्वालिटी खूप चांगली असून ते दीर्घकाळ टिकतात. इथे तुम्ही चारशे रुपयांपासून पुढे तुमच्या पसंतीचे चांगले फुटवेअर्स खरेदी करू शकता. (Pali Hill Mumbai)

  • फॉर एव्हर

फॉर एव्हर हे पाली हिल्सच्या रस्त्याच्या कोनाड्यात असलेले खरेदीच्या खाणीतले एक रत्न आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण या ठिकाणी तुम्हाला जारा आणि एच अँड एम सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचे तसेच भारतातले नॉन ब्रँडेड आणि उत्तम क्वालिटीचे ड्रेसेस खरेदी करता येतील. (Pali Hill Mumbai)

इथल्या टॉप्सच्या किंमती पाचशे रुपयांपासून पुढे आहेत. तर ट्राउजर्सच्या किंमती सहाशे रुपयांपासून सुरू होतात. इथे ट्रायल रुम्स नाहीत. इथल्या दुकानातले कर्मचारी तुम्हाला योग्य खरेदीसाठी मार्गदर्शनही करतात. या ठिकाणी तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डही स्वाईप करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपयाची किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी करावी लागेल. (Pali Hill Mumbai)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : पाकला हरवल्यावर अमेरिकन संघाची आता नजर भारताविरुद्धच्या सामन्यावर)

  • बीयॉन्ड २००० प्लस

तुमच्या मनाच्या कुठल्यातरी छोट्याश्या कोपऱ्यात सुपरहिरोंसाठी छोटीशी जागा असेल तर तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्यायला हवी. पाली हिल्स येथे हाय चॉईस बॅग सेंटरच्या अगदी शेजारी हे दुकान आहे. (Pali Hill Mumbai)

या दुकानात मार्व्हल्स आणि डिसीच्या सगळ्या सुपरहिरोंचे आणि सगळ्या लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरचे प्रिंट असलेले टीशर्ट्स आणि पॅन्ट्स तुम्हाला मिळतील. तसेच इथे वेगवेगळ्या प्रिंट्सच्या कॅपसुद्धा मिळतील. (Pali Hill Mumbai)

हे दुकान जरा लहान आहे. पण इथल्या खरेदी केलेल्या वस्तू जर तुम्हाला आवडल्या नसतील किंवा साईझ बदलून हवी असेल तर इथे एक्स्चेंज करू शकता. या दुकानात तुम्ही पाचशे ते हजार रुपयांच्या आत खरेदी करू शकता. (Pali Hill Mumbai)

  • रिद्धी आर्ट ज्वेलरी

रिद्धी आर्ट ज्वेलरीमध्ये तुम्हाला सणासुदीसाठी सर्व प्रकारच्या एथनिक बॅग्स आणि दागिने मिळतील. यांच्याकडे ब्लिंगी बॅग, स्लिंग्ज, क्लचेस, मिनी बॅग उपलब्ध आहेत. तसेच ब्रेसलेट, कानातले आणि नेकलेसचे अप्रतिम कलेक्शन आहे. रिद्धी आर्ट ज्वेलरीमध्ये रोजच्या वापरातल्या कपड्यांना साजेसे दागिने देखील आहेत. या दागिन्यांची किंमत पाचशे रुपयांपासून पुढे सुरू होते. (Pali Hill Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.