Kadhi Recipe : जूनमध्येही उकडतंय! मग उष्णता दूर करणारी ही सोपी कढी बनवून पाहा

63
Kadhi Recipe : जूनमध्येही उकडतंय! मग उष्णता दूर करणारी ही सोपी कढी बनवून पाहा

वाचकहो, यावर्षी उन्हाने तर कहरच केला आहे. अशी कुठलीही व्यक्ती नसेल जी यावर्षीच्या गर्मीने त्रस्त झाली नसेल. अशावेळी आपल्याला थंड पदार्थ जास्त प्रमाणात खायला आवडतात. जसं की, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम इत्यादी. पण या सर्व पदार्थांमुळे शरीराला तात्पुरता गारवा मिळत असतो. काही वेळाने पुन्हा त्याच घामाच्या धारा सुरू होतात. (Kadhi Recipe)

उष्णतेला हरवण्यासाठी असे कृत्रिमपणे थंड केलेले पदार्थ खाल्ल्याने काही उपयोग होत नाही. उलट अशा पदार्थांमुळे पोटातली उष्णता वाढते. आपलं पोट तसेच शरीर हे आतून थंड राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही निसर्गतःच थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांचं सेवन करायला हवं. जसं की, ताक, दही, दूध, ऊसाचा रस, कलिंगड, काकडी इत्यादी. (Kadhi Recipe)

याशिवाय उन्हाळ्यात जड अन्न पचायलाही त्रास होतो. म्हणून जे अन्नपदार्थ पचायला हलके असतील, असेच अन्नपदार्थ आपण जेवणात खायला हवेत. जसं की, कढी-भात, कढी-खिचडी इत्यादी. कढीमध्ये सगळे पदार्थ योग्य प्रमाणात असतील तर भातासोबत खाण्याची मज्जाच काही और असते. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट पण तितकीच चविष्ट कढी कशी तयार करायची ते सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (Kadhi Recipe)

(हेही वाचा – Pali Hill Mumbai : पाली हिलमध्ये गेल्यावर कोणत्या दुकानातून खरेदी कराल?)

चविष्ट कढी तयार करण्यासाठी सर्वांत आधी तुम्ही खालील साहित्य पाहा

साहित्य :

२ कप दही (आंबट असेल तर उत्तम), २ चमचे बेसन, २ कप पाणी, ४ हिरव्या मिरच्या (अर्ध्या चिरलेल्या), पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठा चमचा ताजी आले पेस्ट, अर्धा चमचा हळद, १ मोठा चमचा साखर (जास्त गोड आवडत नसेल तर कमी घेऊ शकता) आणि चवीनुसार मीठ. (Kadhi Recipe)

फोडणीचं साहित्य :

१ मोठा चमचा तेल, १ मोठा चमचा तूप, १०-१५ कढीपत्त्याची पानं, २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग. (Kadhi Recipe)

कृती :

एका मोठ्या भांड्यात दही, बेसन आणि पाणी एकत्र करून एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या, आले पेस्ट, हळद, साखर आणि मीठ घाला. हे मिश्रण गॅसवर ठेवा. एक उकळी आल्यानंतर मंद आचेवर पाच ते दहा मिनिटं चांगलं शिजू द्या आणि गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेवा. (Kadhi Recipe)

दुसऱ्या बाजूला फोडणीसाठी एका लहान भांड्यामध्ये तेल आणि तूप एकत्र करून मंद आचेवर गरम करून घ्या. ते गरम झाल्यानंतर त्यात सुक्या लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पानं, जिरे, मोहरी आणि हिंग घाला. जिरे- मोहरी तडतडेपर्यंत ते मिश्रण गरम होऊ द्या. त्यानंतर ही फोडणी मोठ्या भांड्यात घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा. तुमची चविष्ट कढी तयार आहे. (Kadhi Recipe)

ही कढी तुम्ही भातासोबत किंवा खिचडीसोबतही खाऊ शकता. वाचकहो, आम्ही सांगितल्याप्रमाणे चविष्ट कढी तयार करून आस्वाद घ्या आणि उष्णतेला दूर पळवा. (Kadhi Recipe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.