रेल्वेतून लांबचा प्रवास करताना काही वेळा आपल्याला चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. पण चालू ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नसल्याने अनेकदा प्रवाशांना आपली इच्छा मारावी लागते. पण आता रेल्वेकडून अशा खवय्या प्रवाशांसाठी एक अनोखी सुविधा देण्यात येणार आहे.
IRCTC ची फूड डिलिव्हरी सर्व्हिस Zoopकडून प्रवाशांना Whatsapp चॅटबॉट सुविधा देण्यात येत आहे. यामुळे केवळ एका Whatsapp मेसेजवरुन प्रवाशांना आपल्या आवडीचे पदार्थ आपण प्रवास करत असलेल्या ट्रेनमध्ये मागवता येणार आहेत.
(हेही वाचाः तुमच्या एका रेल्वे तिकीटासाठी रेल्वेकडून होतो किती खर्च? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आकडे)
अशी आहे सुविधा
यासाठी कोणतेही वेगळे अॅप डाऊनलोड करायची गरज नाही. व्हॉट्सअपवर केवळ आपल्या ट्रेनचा PNR नंबर टाकून प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर आपले आवडते पदार्थ मागवता येणार आहेत. तसेच आपण ऑर्डर केलेल्या पदार्थांचे लाईव्ह ट्रॅकिंग देखील प्रवाशांना करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे पँट्री किंवा इतर विक्रेत्यांवर आता प्रवाशांना अवलंबून रहावे लागणार नाही.
असे ऑर्डर करा पदार्थ
- +91 7042062070 हा Zoop चॅटबॉट नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.
- ज्यावेळी आपल्याला फूड ऑर्डर करायचे आहे, तेव्हा या व्हॉट्सअप नंबरवर Hi मेसेज टाइप करुन सेंड करा.
- Zoop कडून तुम्हाला रिप्लाय येईल ज्यामध्ये Order a Food,PNR Status, Track Order असे ऑप्शन देण्यात येतील.
- यापैकी Order a Food ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला 10 आकडी पीएनआर नंबर एंटर करा.
- त्यानंतर बोगी नंबर आणि विचारण्यात आलेली सर्व माहिती दिल्यानंतर ज्या स्टेशनवर ऑर्डर हवी आहे ते स्टेशन निवडण्यास सांगण्यात येईल.
- त्यानंतर त्या स्टेशनच्या जवळ असणा-या हॉटेल्सपैकी हॉटेल निवडावे लागेल व त्या हॉटेलच्या मेन्यूतून आवडती डिश निवडावी लागेल.
- ऑर्डर केल्यानंतर पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. UPI व नेटबँकिंगच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर आपली ऑर्डर कन्फर्म होईल आणि आपण निवडलेल्या स्टेशनवर ती आपल्या हातात मिळेल.