गणेशोत्सव मंडळांना मिळणार घरगुती दरात वीज, महावितरणचा निर्णय

104

गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य सरकारच्या वतीने मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मंडप उभारण्यासाठी मोफत परवानगी दिल्यानंतर आता महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दरानेच वीज देण्याचा निर्णय महावितरण करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब असून, अधिकृतरित्या वीज जोडणी करुनच रोषणाई करण्याचे आवाहन महावितरणच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

महावितरणचा निर्णय

रोषणाई,मंडप आणि मंडपातील देखाव्यांसाठी अनेकदा गणेशोत्सव मंडळांकडून अधिकृतरित्या वीजजोडणी करण्यात येत नाही. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. याची गंभीर दखल महावितरणच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यामुळेच गणेशोत्सव मंडळांना स्वस्त दराने वीज देण्याचा निर्णय महावितरणच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांकडून अनधिकृत विजेचा वापर करण्यात आल्यास कारवाई करण्याचे आदेशही महावितरणच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

कसे असणार दर?

100 युनिट- 4 रु. 71 पै.
101 ते 300 युनिट- 8 रु.69 पै.
301 ते 500 युनिट- 11 रु.72पै.
500 युनिटपेक्षा जास्त- 13रु.21पै.

मंडळांमध्ये उत्साह

तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषोत साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा धोका कमी असल्यामुळे निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याला राज्य सरकारच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मंडळांना घरगुती दरांत वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.