NPS Rule: जुलै १५ पासून बदलणार गुंतवणुकीचे नियम; जाणून घ्या, नाहीतर…

98

जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण येत्या15 जुलैपासून नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये काही बदल होणार आहेत. 15 जुलैपासून नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीतर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकाद्वारे गुंतवणूकदारांना NPS मधील जोखीम प्रोफाईलबद्दल माहिती देण्यासाठी काही नियम देखील देण्यात आले आहे. याचा हेतू गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढविणे हा आहे.

15 जुलैपासून आता गुंतवणूकदारांना एखाद्या योजनेच्या जोखीम प्रोफाइलबद्दल माहिती मिळू शकेल, जेणेकरून ते किती पैसे गुंतवायचे हे ठरवू शकतील. रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने गेल्या महिन्यातच याबाबत परिपत्रक जारी केले होते. आता पेन्शन फंडांना प्रत्येक तिमाही संपल्यापासून 15 दिवसांच्या आत वेबसाइटवर सर्व योजनांचे जोखीम प्रोफाइल शेअर करावे लागतील. PFRDA ने आपल्या परिपत्रकात NPS मधील जोखीम प्रोफाइलबद्दल गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी नियम तयार केले आहेत. या नियमांमध्ये जोखीमचे सहा स्तर तयार केले आहेत. ते म्हणजे कमी, कमी ते मध्यम, मध्यम, मध्यम उच्च, उच्च आणि अतिशय उच्च असे सहा स्तर आहेत.

(हेही वाचा – RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जोखीम प्रोफाइलिंगचे विश्लेषण तिमाही आधारावर केले जाईल आणि जोखीम प्रोफाइलमधील कोणताही बदल पेन्शन फंडाच्या वेबसाइटवर नोंदवला जाईल. तसेच, NPS ट्रस्टला देखील NPS वेबसाइटवर ते अपडेट करण्यासाठी सूचित केले जाणार आहे. 12 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात या योजनेतील सर्व बदलांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक तिमाही संपल्यापासून 15 दिवसांत त्यांच्या वेबसाइटवर ‘Portfolio Disclosure’ या कलमांतर्गत सर्व योजनांचे जोखीम प्रोफाइल उघड करतील. 31 मार्चपर्यंत वार्षिक आधारावर योजनांची जोखीम स्तर आणि वर्षभरात किती वेळा जोखीम स्तर बदलला आहे, हे पेन्शन फंडाच्या वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल. तर टियर I, टियर II, अॅसेट क्लास इक्विटी (E), कॉर्पोरेट डेट (C), सरकारी सिक्युरिटीज (G) आणि स्कीम A सह पेन्शन फंडांना योजनांची जोखीम प्रोफाइल सांगणे अनिवार्य आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.