Marathi Paithani Blouse Designs : पैठणी साडीचा ब्लाऊज असा शिवा !

197
Marathi Paithani Blouse Designs : पैठणी साडीचा ब्लाऊज असा शिवा !
Marathi Paithani Blouse Designs : पैठणी साडीचा ब्लाऊज असा शिवा !

‘साडी’ हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अगदी सगळ्या प्रसंगासाठी महिलांकडे साड्या असतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्या घेणे आणि त्या नेसणे हा महिलांचा छंदच असतो. साड्यांचे कितीही प्रकार घेतले, तरी देखील ते कमीच असतात. साडी कशी नेसायची, हे महिलांना सांगायला नको. साडीवरील ब्लाऊजही तेवढेच महत्त्वाचे असतात. मग तो सेलिब्रिटी स्टाईल ब्लाऊज डिझाईन शिवणे असो किंवा लेटेस्ट फॅशन ब्लाऊज असो. कारण साध्या साडीलाही एक वजनदार लुक देत असतो, तो म्हणजे ब्लाऊज. ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार हल्ली बाजारात पाहायला मिळतात.  (Marathi Paithani Blouse Designs)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मी माघार घेतली तरी अजित पवार जिंकणार नाही; विजय शिवतारे यांचे आव्हान)

मोर, काठ किंवा मुनियाचा वापर करा

काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन (Kathachya Sadiche Blouse Design) हे जरा जास्तच उठून आणि शोभून दिसतात. साड्यांचे प्रकार विचारात घेता काठपदरी साड्यांमध्ये विविधता दिसून येते. काठाच्या साड्या म्हटल्या की, आपल्यासमोर पैठणी, कांजिवरम, साऊथ इंडियन पट्टू साड्यांचे ब्लाऊज,बनारसी साडी, कांचिपुरम साडी असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आज आपण पैठणी साडीचे ब्लाऊज डिझाईन पहाणार आहोत.

साड्यांची महाराणी म्हणून पैठणी (Paithani) साडी ओळखली जाते. त्यावरील काम हे नेहमीच वेगळे आणि आकर्षक दिसते. पैठणींचे प्रकार, साड्यांचे प्रकार वेगवेगळे आणि सुंदर असतात. हल्ली बाजारात खास पैठणीचे ब्लाऊज पीस मिळतात. अत्यंत महाग आणि खास डिझाईन्सच्या या ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज शिवताना तुम्हाला यावरील मोर, काठ किंवा मुनियाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे.

पैठणी काठाचा ब्लाऊज शिवताना ‘हे’ पहा
  • ब्रोकेड कपडा निवडला असेल, तर तुम्ही छान पूर्ण भरलेला ब्लाऊज शिवा.
  • तुम्हाला जर डिझाईन करता आली, तर खूपच चांगली गोष्ट; कारण असा ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही काठापदराच्या साडीवर चांगला दिसतो.
  • तुमच्या काठावर मोर किंवा फुलांची नक्षी असेल, तर तुम्हाला ती काढून त्याचा कटवर्क करून हातावर किंवा पाठीवर घेता येते.
  • जर तुम्हाला ब्लाऊज खूप हेवी करायचा असेल, तर तुम्ही मोर किंवा पोपट कापून तो लावा. त्याच्या आजुबाजूला डिझाईन करा. तो ब्लाऊज छान उठून दिसेल.
  • पैठणी ब्लाऊजचे हात हे लांब छान दिसतात. त्यामुळे स्लिव्हलेस ब्लाऊज शिवून त्याचा सगळा गेटअप घालवू नका. (Marathi Paithani Blouse Designs)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.