Health Tips :हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी खा ‘हे’ ९ पदार्थ

200
Health Tips :हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हे' ९ पदार्थ
Health Tips :हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हे' ९ पदार्थ

मुंबईसह महाराष्ट्राच गेल्या काही दिवसांपासून बदलते वातावरण आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडी (Winter Season) अजूनही अनुभवता आली नाही. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम झालेत. सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार पसरले आहेत. अशावेळी इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. (Health Tips)

इम्युनिटी म्हणजे काय?

शरीरात रोगांपासून संरक्षण करण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली असते, ज्याला रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. जर तुम्हाला वारंवार खोकला, सर्दी, संसर्ग, अशक्तपणा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. ज्या लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांनी अनेक आजारांना सामोरे जावे लागते आणि नंतर औषधांवर पैसे खर्च करावे लागतात.  (Health Tips)

हे पदार्थ आवर्जून खा –

अनेकजण लसूण आणि आलं जेवणातून बाहेर काढून टाकतात. या दोन्ही गोष्टी अनेक धोकादायक जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लसणाच्या 4-5 कच्च्या पाकळ्या रोज खाव्यात. दुसरीकडे, सकाळी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचा रस मध आणि कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. (Health Tips)

हिवाळ्यात मुळा खा –

थंडीमध्ये सायनस, नाक बंद होणे, श्लेष्मा, मायग्रेन यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुळा खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात. कच्च्या मुळ्याचा रस काढून हिवाळ्यात रोज सेवन करा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

बाजरी, सूर्यफुलाच्या बिया, पालक असे जस्त पदार्थ खा -व्हिटॅमिन ए, सेलेनियम, क्रोमियम, झिंक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई यासारखे अँटिऑक्सिडंट्स रोज घ्या गाजर, रताळे, ब्रोकोली, पालक, व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन समृद्ध चेरी खा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.