श्रावण महिन्याला Shrawan सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात अनेक जण व्रत वैकल्ये करतात, उपवास करतात. अशातच मधुमेहाच्या प्री-मधुमेह किंवा मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते. मधुमेहींच्या रुग्णांसाठी कोणत्या अन्नपदार्थांची निवड करावी याबाबत अनेकांचा संभ्रम असतो. मधुमेहाच्या रूग्णांसाठी अशाच काही पदार्थांची नावे आपण जाणून घेणार आहोत.
ताज्या फळांचे करा सेवन
ताज्या फळांचे सेवन हे नेहमी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. श्रावण Shrawan महिन्यात ताज्या फळांचे सेवन केले तर त्याचा फायदा मधुमेही रूग्णांना होऊ शकतो. कारण, फळांमध्ये ग्लायसेमिक सूचकांक कमी असतो. तुम्ही श्रावणात नाशपती, संत्री, ब्लूबेरीज, सफरचंद, चेरी, पीच, प्लम्स, द्राक्ष, अव्हाकाडो, पेरू इत्यादी फळांची निवड करू शकता. कारण या फळांमध्ये अत्यावश्यक पोषक घटक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण फार जास्त असते. या फळांच्या नियमित सेवनाने तुम्हाला झटपट ऊर्जाही मिळते आणि लवकर भूकही लागत नाही.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करणाऱ्या भाज्या
रताळी, बटाटे, बीन्स, गाजर, काकडी, मूळा यांसारख्या भाज्या आणि मसूरसारख्या डाळी संपूर्ण श्रावणभर मधुमेही रूग्ण खाऊ शकतात. या भाज्यांच्या सेवनाने रक्ताच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता कमी असते. याच संदर्भात अबॉट न्यूट्रिशनच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ. इरफान शेख म्हणतात की, श्रावणात Shrawan तुम्ही काही निवडक पदार्थांची निवड करू शकता. जर तुम्ही वरील पदार्थांचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील.
Join Our WhatsApp Community