तुमचं WiFi स्लो चालतंय का? मग जोडा ‘हे’ डिव्हाईस, स्पीड होणार सुपरफास्ट!

90

कोरोना महामारीदरम्यान वायफायचा वापर झपाट्याने वाढला आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसवर काम करणाऱ्यांसाठी वायफाय खूप महत्त्वाचे झाले आहे. अधिक स्पीडसाठी लोक मोबाईल इंटरनेटऐवजी वाय-फाय वापरतात, परंतु काही वेळा वायफायचा वेग कमी झाल्याने सर्व कामे ठप्प होतात. त्यामुळे आज अशा डिव्हाईसबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा वायफाय स्पीड वाढेल आणि काही मिनिटांत चित्रपट डाउनलोड असेल किंवा तुमचे काम होऊ शकेल. जर तुम्ही Wifi चा स्पीड वाढवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात अतिशय पॉवरफुल डिव्हाईस उपलब्ध आहे. हे डिव्हाईस तुमच्या वायफायचा स्पीड तर वाढवेलच पण ते विकत घेणे खूप किफायतशीर आहे. जाणून घ्या त्याबद्दलच…

वायफायची सिग्नल स्ट्रेंथ वाढवण्यास मदत

ज्या डिव्हाईसबद्दल आपण बोलत आहोत त्याला वायफाय रेंज एक्स्टेंडर म्हणतात. हे तुमच्या वायफायची सिग्नल स्ट्रेंथ वाढवण्यास मदत करते. ते घरी लावल्यानंतर, तुम्हाला सिग्नलबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वायफाय वेगवान गतीने सातत्याने काम करेल. जर तुमच्या घरातील वायफाय सिग्नल खूप कमी असेल आणि तुम्ही कमी स्पीडमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते डिव्हाईस लावताच इंटरेनटचा वेग सुपरफास्ट होईल. तुम्हाला फक्त ते प्लग इन करायचे आहे, जसे तुम्ही प्लगमध्ये डासांपासून बचाव करणारे यंत्र (मॉस्कीटो रिपेलेंट डिवाइस) बसवता त्याप्रमाणे तुम्हाला ते कनेक्ट करायचे आहे. ते डिव्हाईस कनेक्ट होताच वायफायचा वेग वाढतो.

(हेही वाचा – इंटरनेट संपले? ‘या’ अ‍ॅपचा वापर करत मिळवा मोफत वायफाय!)

परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध

हे डिव्हाईस 2559 रुपयांपासून उपलब्ध आहे आणि तुम्ही ते Amazon वरून खरेदी करू शकता. TP-Link RE300 AC1200 Mesh Wi-Fi Range Extender ची किंमत 5,999 रुपये असली तरी Amazon वरून 2,399 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच या डिवाइसवर सध्या 3,600 रुपयांची सूट दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.