WhatsApp New Feature : आता नंबर सेव्ह न करता करा चॅटिंग

296

WhatsApp हे सद्यस्थितीला सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसजिंग अ‍ॅप आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप एकापेक्षा एक नवीन फीचर्स आणत असून आताही कंपनीने नवीन फीचर लाँच केले आहे, ज्यामुळे आता तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर सेव्ह न करता चॅट आणि कॉल करू शकता. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगसाठी, तुम्हाला समोरील युजरचा मोबाइल नंबर सेव्ह करण्याची गरज नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या या नव्या फीचरमुळे अनेक युजर्सची चिंता दूर झाली आहे. कारण आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याशी चॅट करण्यासाठी तुम्हाला त्यांचा मोबाइल नंबर सेव्ह करावा लागत होता. मात्र आता या समस्येतून सुटका होणार आहे. कारण आता यूजर्स मोबाईल नंबर सेव्ह न करताही व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि कॉलिंग करू शकणार आहेत. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

(हेही वाचा Tata Hospital : टाटा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवणाऱ्या रॅकेटमधील अकरा जणांना अटक)

कसा कराल वापर?

सर्वप्रथम, ज्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला चॅट करायचे आहे तो नंबर कॉपी करा. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर न्यू चॅट ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर वर एक सर्च बॉक्स दिसेल, ज्यावर कॉपी मोबाइल नंबर लिहावा लागेल किंवा तुम्ही थेट कॉपी पेस्ट करू शकता. यानंतर तुम्हाला Looking Outside Your Contact वर क्लिक करावे लागेल. जर तो मोबाईल नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर असेल तर त्याच्याशी संबंधित नाव आणि चॅटचा पर्याय दिसेल. यानंतर, चॅट ऑप्शनवर क्लिक करताच एक नवीन चॅट विंडो उघडेल.

मोबाईल नंबरनेही करता येणार लॉगिन

आतापर्यंत तुम्हाला डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा लागत होता. कधीकधी QR कोड स्कॅन होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चालवता येत नाही. पण आता तुम्हाला मोबाईल नंबरने व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.