Beauty Tips : थंडीत पायाच्या टाचा फुटतात, ‘हा’ घरगुती उपाय करून बघा

बहुतेक स्त्रियांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

188
Beauty Tips : थंडीत पायाच्या टाचा फुटतात, 'हा' घरगुती उपाय करून बघा
Beauty Tips : थंडीत पायाच्या टाचा फुटतात, 'हा' घरगुती उपाय करून बघा

थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडतातच. भेगाळलेल्या टाचा म्हणजे तरुणी आणि महिलांसाठी एक समस्याच असते. पायांना भेगा (HOW TO CARE FOR DRY, CRACKED HEELS IN WINTER SEASON) पडलेल्या असतील तर इन्फेक्शन होण्याचा धोका आणखी वाढतो. यामुळे पायांना जखमही होऊ शकते. हिवाळ्यात बरेचदा आपल्यापैकी बहुतेक स्त्रियांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. . पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा (foot care) दूर करण्याचा आणि फुटलेले – खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम घरगुती आपण करून बघू शकता.

थंडीत रूक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणं प्रेत्येकवेळी शक्य नसतं. अशावेळी आपण होममेड फूट केअर क्रिम वापरणे फायदेशीर ठरु शकते.

– पायाला हलक्या हाताने मसाज केल्यास मॉश्चर कायम राहून त्वचा मऊ राहते.

– होममेड फूट केअर क्रिम उपयुक्त ठरते.

एका छोट्याशा काचेच्या डबीत प्रत्येकी १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली व खोबरेल तेल घ्यावे. पेट्रोलियम जेली व खोबरेल तेल चमच्याने मिसळून एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून ग्लिसरीन व लिंबाच्या रसाचे ५ ते ६ थेंब घालावे. हे सगळे मिश्रण चमच्याने ढवळून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. आपले हिल रिपेअर क्रिम पायाला लावण्यासाठी तयार आहे.

पायांच्या भेगा दूर करण्यासाठी सोपे उपाय –

– रोज रात्री झोपताना ही तयार केलेली क्रिम पायांवर ज्या ठिकाणी भेगा आहेत त्या ठिकाणी लावून मसाज करून घ्यावा.
– मसाज करुन घेतल्यानंतर पायांत पायमोजे घालूंन झोपावे.
– आपण दिवसातून फक्त दोन वेळा ही क्रिम लावल्यास पाय अत्यंत मऊ आणि उत्तम होतात. भेगांना खोबरेल तेल लावल्यास खूप आराम मिळतो.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.