‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती

‘ओव्हरस्मार्ट’ हॅकर्सपासून वाचण्यासाठी आपल्यालाही ‘सुपर स्मार्ट’ होण्याची गरज आहे. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी या टिप्स नक्की वाचा आणि टेंशन फ्री ऑनलाईन व्यवहार करा.

155

कोरोना काळात ऑफलाईन व्यवहार करणं कठीण आणि जोखमीचं झाल्याने, सध्या ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. कॅशलेस व्यवहारांचा लॉकडाऊनच्या काळात फार मोठा फायदा होत आहे. अगदी दूधवाला, पेपरवाल्यापासून ते लाईट बिलापर्यंत सगळे पैशांचे व्यवहार हे एका क्लिकवर होत आहेत. यासाठी ऑनलाईन बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. पण या ऑनलाईन व्यवहारांवर सध्या हॅकर्सची छुपी नजर आहे. हे ओव्हरस्मार्ट हॅकर्स सध्या स्मार्ट फोनद्वारे होणा-या ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत असल्याच्या घटना, आपण वाचल्या किंवा ऐकल्या आहेत. याच ‘ओव्हरस्मार्ट’ हॅकर्सपासून वाचण्यासाठी आपल्यालाही ‘सुपर स्मार्ट’ होण्याची गरज आहे. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी या टिप्स नक्की वाचा आणि टेंशन फ्री ऑनलाईन व्यवहार करा.

वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना…

फास्ट डेटा स्पीडसाठी सध्या वाय-फायचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. रेल्वे स्टेशन, मॉल्स अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. पण या पब्लिक वाय-फाय सर्विसचा वापर करुन, ऑनलाईन व्यवहार करणे अत्यंत धोक्याचे आहे.

wifi

ही वाय-फाय सेवा असुरक्षित असल्याने त्याचा काही हॅकर्स गैरवापर करतात. या माध्यमातून हॅकर्स तुमच्या डिव्हाईसमध्ये तुमच्या नकळत एखादं सॉफ्टवेअर इंन्स्टॉल करुन, तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा चोरू शकतात. तुमचे बॅंक डिटेल्स मिळवून, हे हॅकर्स तुम्हाला चांगलाच चूना लावू शकतात. म्हणून या वाय-फाय सर्विसचा वापर करुन, कधीही पैशांचे व्यवहार करू नका. घरात असताना सुद्धा आसपासच्या भागातील उपलब्ध वाय-फाय कनेक्शनचा वापर करणे टाळा.

पब्लिक चार्जिंग स्टेशनचा वापर टाळा

‘जॅकिंग’ हा सायबर क्राईमचा प्रकार सध्या फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करताना, यूएसबी केबलच्या माध्यमातून डेटा चोरण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जातो.

charging

त्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल चार्ज करु नयेत. अगदीच गरज असल्यास स्वतःच्या चार्जिंग केबलने मोबाईल चार्ज करणे, कधीही सुरक्षित आहे.

बॅंकेबाबतची माहिती गुगलवर सर्च करू नका

प्रत्येक गोष्ट गुगलवर सर्च करण्याची आपल्याला हल्ली सवय लागली आहे. पण आपले अकाऊंट असलेल्या बॅंकेबाबतची कुठलीही माहिती गुगलवरील इतर कुठल्याही साईटवरुन मिळवणं टाळा.

google

बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवरच बॅंकेबाबतचे डिटेल्स मिळवणं जास्त सुरक्षित आहे.

अ‍ॅप इन्स्टॉल करताना सावधान

गेम इन्स्टॉल करण्यासाठी हल्ली इतर अनधिकृत साईट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे स्मार्टफोन आणि त्यामधील डेटा दोघांनाही मोठ्या प्रमाणावर धोका संभवतो.

app

म्हणून गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल स्टोर सारख्या विश्वसनीय अ‍ॅप स्टोरमधूनच अ‍ॅप इन्स्टॉल करणे अधिक सुरक्षित आहे.

गॅजेट ठेवा अपडेटेड

मोबाईल किंवा लॅपटॉप सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करू नका. आपली ही गॅजेट्स वेळच्या वेळी अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सायबर क्राईमचा धोका कमी होण्यास मदत होते.

software update

नवीन अपडेट्स हे ऑपरेटिंग सिस्टिमला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अद्ययावत ठेवत असल्याने, ते हॅक करणे कठीण असते.

बॅंक लिंकवर क्लिक करण्याआधी…

मेसेज किंवा ई-मेलद्वारे येणा-या आर्थिक व्यवहारांशी संबंधित बॅंक लिंकवर क्लिक करताना, त्याबाबतची नीट खात्री करुन घ्या.

fraud link

या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी URL नक्की तपासा. तो संशयास्पद असल्यास त्यावर क्लिक करू नका.

सोशल मीडियावर बॅंक डिटेल्स शेअर करताय? मग हे वाचा

आपल्या बॅंक अकाऊंटशी संबंधित माहिती कोणासोबतही फेसबूक, ट्विटर किंवा इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करणे टाळा. या प्लॅटफॉर्मवरील माहिती सायबर गुन्हेगारांना हॅक करणे सहज शक्य आहे.

social media

पासवर्डबाबत सतर्क रहा

ऑनलाईन बॅंकिंगसाठी कायमच स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करा. यामध्ये नंबर, कॅपिटल आणि स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर करा.

password

यामुळे आपले अकाऊंट अधिक सुरक्षित होण्यास मदत होते. तसेच वेळोवेळी हा पासवर्ड बदलत रहा. जेणेकरुन हॅकर्सना तो शोधणे शक्य होणार नाही.

मोबाईल नंबर लिंक करताना ही काळजी घ्या

तुम्ही कायम वापरत असलेला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीच आपल्या बॅंक अकाऊंटसोबत लिंक करा. जेणेकरुन तुमच्या बॅंक व्यवहारांची माहिती तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील.

mobile alert msg

तसेच तुमच्या अकाऊंटवरुन कोणी ऑनलाईन व्यवहार करत असल्यास, त्याबद्दलची माहिती येणा-या अलर्टमुळे तुम्हाला लगेच मिळत राहील.

अ‍ॅप परमिशनबाबत सावधता बाळगा

मोबाईलमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्याबाबतची परमिशन पॉलिसी काळजीपूर्वक वाचा आणि मगच अ‍ॅप परमिशन सुरू करा. यामुळे तुमच्या मोबाईलमधील माहिती हॅकर्सना मिळणे शक्य होणार नाही.

app permission

फसवणूक झाल्यास घाबरू नका

समजा तुमची ऑनलाईन फसवणूक झाली किंवा तुमचा मोबाईल किंवा एटीएम कार्ड हरवले, तर घाबरुन जाऊ नका. त्वरित आपल्या बॅंकेशी संपर्क साधून आपले अकाऊंट तात्पुरते बंद करा. जेणेकरुन त्यामार्फत कुठलेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. त्यानंतर जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर सेलमध्ये याबाबतची रितसर तक्रार करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.