Health Tips : डाळिंबाच्या रसाचे बहुगुणी फायदे जाणून घ्या

डाळिंबाच्या रसातील अँण्टिऑक्सिडंट्समुळे शरीरावरील वृद्धत्वाच्या खुणा दूर होण्यास मदत होते

74
Health Tips : डाळिंबाच्या रसाचे बहुगुणी फायदे जाणून घ्या
Health Tips : डाळिंबाच्या रसाचे बहुगुणी फायदे जाणून घ्या

डाळिंबाला वैद्यकीय भाषेत सुपरफूड म्हटले जाते. दररोज डाळिंबाच्या रसाने (Health Tips) शरीराचे पोषण होते. डाळिंबाच्या रसात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँण्टिऑक्सिडंट्स शरीरात सहज शोषले जातात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. जाणून घेऊया डाळिंबाच्या रसाचे बहुगुणी फायदे – 

– डाळिंबाच्या रसामुळे ह्रदय निरोगी राहते. कर्करोगासारख्या आजारांशी लढण्याची ताकद वाढते.

– डाळिंबाच्या रसातील अँण्टिऑक्सिडंट्समुळे शरीरावरील वृद्धत्वाच्या खुणा दूर होण्यास मदत होते याशिवाय तारुण्य टिकून राहते.

– पचनविकाराचा त्रास असणाऱ्यांनी डाळिंब खावे किंवा डाळिंबाचा रस प्यावा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. वजनवाढीवरही नियंत्रण राहाते.

– दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील ऊर्जा वाढायला मदत होते. ताजेतवाने वाटते.

– डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. जर अपचन, गॅस, शौचास साफ न होणे अशा समस्या असतील तर आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करणे गरजेचे आहे. डाळिंबात फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.

– मधुमेहाच्या उपचारात डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. डाळिंबाचा उपयोग इन्सुलिन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी केला जातो.

टीप – डाळिंबाच्या रसाचे सेवन वैद्यांच्या सल्ल्याने करावे. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.