Health Tips : अनवाणी चालण्याचे फायदे, जाणून घ्या…

अनवाणी जमिनीवर चालल्याने पायांद्वारे संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते.

51
Health Tips : अनवाणी चालण्याचे फायदे, जाणून घ्या...
Health Tips : अनवाणी चालण्याचे फायदे, जाणून घ्या...

डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांवर (Health Tips) आराम मिळण्यासाठी दिवसातून किमान अर्धा ते एक तास अनवाणी चालल्याने फायदा होतो. धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. नवरात्रीत बरेच जण अनवाणी चालतात, मात्र आरोग्याच्या दृष्टिने विचार करता अनवाणी चालण्याचे अनेक फायदे आहेत. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी तज्ज्ञ अनवाणी (walking barefoot) चालण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया, याविषयी तज्ज्ञ काय सांगतात.

– बाहेर जाताना किंवा ऑफिसमध्ये असताना आपण शूज किंवा चप्पल घालून बसतो. यामुळे आपले पाय बांधून ठेवल्यासारखे राहतात. अशा स्थितीत मोकळ्या हवेत अनवाणी चालल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळते. रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे पायांचा थकवा व वेदना दूर होतात.

– अनवाणी चालल्याने सर्व स्नायू सक्रिय होतात. यासह पायांव्यतिरिक्त, त्यांच्याशी संबंधित शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात.

– अनवाणी चालत असताना पायाच्या बोटांचा खालचा भाग थेट जमिनीच्या संपर्कात येतो. ज्यामुळे सर्व अंगांचा एक्यूप्रेशरद्वारे व्यायाम होतो आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो.

– अनवाणी जमिनीवर चालल्याने पायांद्वारे संपूर्ण शरीराला उर्जा मिळते. शिवाय नैसर्गिकरित्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. शरीराचे अवयव अधिक सक्रिय, सुडौल राहतात. यासोबतच शरीराचे रक्ताभिसरणही सुधारते.

– नियमित अनवाणी चालल्याने शरीरातील उर्जेची पातळी तर वाढतेच, शिवाय तणाव, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश, हृदयाशी संबंधित समस्या, संधिवात, दमा, ऑस्टिओपोरोसिस या समस्या दूर राहतात.

– अनवाणी चालणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. रिफ्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार, जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपल्या पायांचा सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते.

(हेही वाचा –Drugs Seized : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, मुंबई पोलिसांचा कारखान्यावर छापा )

– सकाळी कोवळ्या उन्हात गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्याने दिवस फ्रेश जातो. यासह जीवनसत्त्व डी देखील मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच जीवनसत्त्व ‘डी’मुळे शरीरातील अनेक आजार दूर करतात. वजनवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनवाणी चालल्याने फायदा होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.