Health Tips : दुधात जायफळ घालून प्या, होतील ‘हे’ फायदे

जायफळात दाहकविरोधी गुणधर्म असतात.

115
Health Tips : दुधात जायफळ घालून प्या, होतील 'हे' फायदे
Health Tips : दुधात जायफळ घालून प्या, होतील 'हे' फायदे

दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडिन, लोह, मॅग्नेशियम, प्रथिन, फायबर, जीवनसत्त्व सी, बी६, ए, सोडियम आणि जस्त असे अनेक पौष्टिक घटक असतात. दुधाची (Health Tips) पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यामध्ये चमचाभर जायफळ पावडर घालावी. आयुर्वेदानुसार, याचे फायदेही सांगण्यात आले आहेत.

 निद्रानाश, पोटाचे विकार यांसह इतर आजारांवर दुधात जायफळ घालून प्यायल्यास फायदा होतो.

हल्ली ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मानसिक समस्या दूर करण्यासाठी दुधात जायफळ घालून प्यायल्यास फायदा होतो. जायफळात अँण्टी स्ट्रेस गुणधर्म असतात. जे तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. (useful for relieving stress)

पोटाचे अनेक विकार दूर करण्यासाठी दुधात जायफळ घालावे, यासाठी कपभर दूध गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर दुधाला उकळी आल्यास त्यात चमचाभर जायफळ पावडर घाला. चमच्याने ढवळा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. दूध कोमट झाल्यानंतर प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते.

(हेही वाचा – Yamaha XSR 155 : यामाहाची आशियात गाजलेली CSR 155 बाईक आता येणार भारतात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये )

दुधात जायफळ मिसळून प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. नैसर्गिक चमक येते. चेहऱ्यावरील मुरमांचे डागही कमी होतात.

जायफळात दाहकविरोधी गुणधर्म असतात. नियमित जायफळ दूध प्यायल्याने सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.