TVS Fiero 125 : टीव्हीएस कंपनीची महेन्द्र सिंह धोनीला आवडलेली बाईक तुम्ही बघितली आहे का?

59
TVS Fiero 125 : टीव्हीएस कंपनीची महेन्द्र सिंह धोनीला आवडलेली बाईक तुम्ही बघितली आहे का?
TVS Fiero 125 : टीव्हीएस कंपनीची महेन्द्र सिंह धोनीला आवडलेली बाईक तुम्ही बघितली आहे का?
ऋजुता लुकतुके

टीव्हीएस कंपनीने आपल्या फिएरो या बाईकच्या ट्रेडमार्कची नोंदणी करून घेतली आहे. हा ब्रँड लोकांमध्ये भलताच लोकप्रिय झाला होता. आणि म्हणून त्याची ‘कॉपी’ टाळण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. साक्षात महेन्द्र सिंह धोनीलाही आवडलेली ही बाईक समजून घेऊया… (TVS Fiero 125)

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेन्द्र सिंह धोनी हा बाईकचा चाहता आहे. आणि आताही वेगवान आणि त्याचबरोबर शहरांमध्ये चालवण्या योग्य बाईकचा ताफा त्याच्या गॅरेजमध्ये आहे. यातच एक आहे टीव्हीएसची रिनन ही बाईक. आणि त्याच्याबरोबरच अलीकडे धोणीने त्याच्या ताफ्यातील टीव्हीएस फिएरो ही बाईकही लोकांना दाखवली होती.

टीव्हीएस फिएरो हा कंपनीचा ब्रँड धोनीच नाही. तर भारतात लोकप्रिय ठरला होता. इतका की, कंपनीने त्या ट्रेडमार्कची नोंदणी करून घेतली. आता फिएरो हे नाव एकटी टीव्हीएस कंपनी आपल्या बाईकच्या विशिष्ट सीरिजसाठी वापरू शकते.

फिएरो १२५ ही बाईक आता कंपनी अद्ययावरत स्वरुपात लाँच करणार आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील महिन्यात सुरुवातीला ही बाईक लाँच होईल अशी शक्यता आहे. नावाप्रमाणेच या बाईकमध्ये १२५ सीसी क्षमतेचं एअरकूल इंजिन असेल. आणि थ्री वॉल्व इंजिनमधून ११.३८ पीएस इतकी ऊर्जा निर्माण होईल. गाडीला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क असेल. आणि मागच्या बाजूला शॉक ॲबझॉर्बर बसवलेले असतील. आणि बाईकला ५ स्पीड गिअरबॉक्स असेल.या बाईकची किंमत ८०,००० रुपयांपासून सुरू होईल. आणि एकदा बाजारात आल्यावर होंडा सीबीशाईन, हीरो ग्लॅमर १२५ आणि बजाज पल्सर १२५ या बाईकशी तिची स्पर्धा असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.