LifeStyle : मुलांची उंची वाढवायची असेल, तर करा ‘ही’ योगासने

93

तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर पाडायची असेल, तर तुमची उंची खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, तुमच्या मुलाने उंच असणे गरजेचे आहे. बरेच पालक त्यांच्या मुलांच्या उंची विषयी खूप काळजी करतात, ते त्यांना  खाऊ पिऊ घालतात; परंतु त्यांच्या LifeStyle कडे, व्यायामाकडे लक्ष देत नाही. या लेखात काही अशी योगासने आहेत, जी केल्याने तुमच्या मुलाची उंची नक्कीच वाढेल.

बऱ्याचदा उंची ही अनुवांशिक असल्यामुळे देखील कमी असू शकते, पण तरी ही शरीराला सवय लागली तर त्यांची उंची वाढू शकते. तुमच्या मुलाच्या दिनचर्येत बदल करा आणि दररोज योगासनं करण्याची सवय लावा. त्यामुळे मुलांच्या शरीराची लवचिकता वाढते. दोन वर्षानंतर दर वर्षी मुलांची उंची २.५ इंच वाढते आणि तरुणपण आल्यानंतर मुलाची उंची वाढते परंतू मुलीची उंची तितकीच रहाते.

योगा हा सगळ्या वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे, केवळ मुलांनीच नव्हे तर आपण देखील रोजच्या जीवनात योगाभ्यासाचा सराव केला पाहिजे. या लेखातून आज आपण उंची वाढवण्यासाठीचे योगासने पाहणार आहोत. जर तुमच्या मुलाची उंची कमी असेल तर हि योगासने करण्याची सवय त्यांना लावा.

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS Sri Lanka : भारताकडून लंकादहन; ३०२ धावांनी श्रीलंकेचा दारुण पराभव)

एकपदासाना योग :

एकपदासाना केल्याने तुमच्या मुलाची उंची लवकर वाढेल आणि डोळे आणि हृदय कायम उत्तम प्रकारे कार्य करेल. सुरुवातीला, सरळ उभे राहा, मग दोन्ही हात वर करून एक पाय उचला, तोच पाय मागच्या बाजुला हवेत तरंगत ठेवा आणि हात जोडून ते पुढच्या बाजूला तरंगत ठेवा. ही पोस ३० सेकंड् पर्यंत करा आणि मग पाय बदला. या योगासनामुळे हात आणि पाय दोन्ही ताणले जातात आणि स्नायू मजबूत होतात.

ताडासन :

हे आसन करण्यासाठी, सुरुवातीला सरळ उभे रहा. मग दोन्ही पाय जोडून उभे रहा आणि हात समोर जोडा. मग दोन्ही हात वर करून टाचांवर उभे रहा आणि दीर्घ श्वास घ्या. हे असे केल्याने शरीर ताणले जाते आणि स्नायुमध्ये लवचिकता वाढते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.