Beauty Tips : मुलायम, चमकदार आणि दाट केसांसाठी, घरच्या घरी वापरा हेअर मास्क

हे मिश्रण केसांच्या मुळांशी आणि केसांवरही एकसारखे लावा.

80
Beauty Tips : मुलायम, चमकदार आणि दाट केसांसाठी, घरच्या घरी वापरा हेअर मास्क
Beauty Tips : मुलायम, चमकदार आणि दाट केसांसाठी, घरच्या घरी वापरा हेअर मास्क

केसगळती (Beauty Tips ) रोखण्यासाठी तसेच ते मऊ, मुलायम, छान सिल्की आणि शायनी दिसावेत, असे प्रत्येकीला वाटत असते. यासाठी शरीराला आतून पोषण मिळणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे प्रदूषणापासून त्यांचे रक्षण करणे, रासायनिक पदार्थ वापरणे टाळणे हेही आवश्यक असते. केसांचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बाजारातील महागड्या ट्रिटमेंट घेणे सगळ्यांनाच जमते असे नाही. अशा वेळी नैसर्गिक उत्पादनांपासून तयार केलेले घरगुती मास्कही फायदेशीर ठरू शकतात. यामुळे केस मुलायम आणि दाट व्हायलाही मदत होते शिवाय केसांची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. पाहूया केसांसाठी फायदेशीर घरगुती हेअर मास्क –

– एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ जास्वंदाची फुलं, ४ ते ५ जास्वंदीच्या झाडाची पानं घ्या. त्यामध्ये १२ ते १५ कडुलिंबाची पानं आणि साधारण २ चमचे कोरफडीचा गर घाला. हे सगळे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांशी आणि केसांवरही एकसारखे लावा. साधारण १ तास हा मास्क केसांवर ठेवून नंतर हलक्या शाम्पू आणि कंडीशनरने केस धुवा.

हेअर मास्कचे फायदे…
केस वाढण्यास मदत होते तसेच केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. केसगळती रोखण्यास फायदेशीर ठरते. केसांचा पोत मुलायम होण्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे याशिवाय या मास्कमुळे केसांतील कोंडाही कमी होऊन केसांची चांगली वाढ होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.