bandstand mumbai : जीवाची मुंबई करायची असेल तर बॅंडस्टॅंडला नक्कीच भेट द्या

69
bandstand mumbai : जीवाची मुंबई करायची असेल तर बॅंडस्टॅंडला नक्कीच भेट द्या

मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. तुमच्यात कौशल्य आणि कष्ट करण्याची क्षमता असेल तर इथे तुमची स्वप्ने तुम्ही पूर्ण करु शकता. ही कष्टकर्‍यांची नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मुंबईत बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे बॅंडस्टॅंड. (bandstand mumbai)

बॅंडस्टॅंडचे (bandstand) वैशिष्ट्य म्हणजे इथे बॉलिवूडचे अनेक कलाकार राहतात. त्यामुळेच या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणाची निर्मिती १८८४ मध्ये मुंबईत तैनात असलेल्या ब्रिटीश सैन्यासाठी लाकडी जेट्टी म्हणून करण्यात आली. १८९६ मध्ये, ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड एल्गिन यांनी बँडस्टँड म्हणून पुन्हा बांधकाम केले आणि क्वीन्स पार्क असे नामकरण केले. (bandstand mumbai)

१९२० मध्ये आलेल्या वादळामुळे बँडस्टँडचे नुकसान झाले होते आणि १९२१ मध्ये पुन्हा याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. १९८५ मध्ये या विहाराचे नाव बँडस्टँड प्रोमेनेड असे ठेवण्यात आले. बँडस्टँड प्रोमेनेड हे मुंबईच्या वांद्रे परिसरात स्थित एक समुद्रकिनारी विहार आहे. वरच्या विहारातून अरबी समुद्राचं सौंदर्य तुम्ही पाहू शकता. निवांत वेळ घालवण्यासाठी आणि चालण्याचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. खालच्या विहारामध्ये हँगिंग गार्डन, माउंट मेरी चर्च आणि वांद्रे किल्ला अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. (bandstand mumbai)

तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथे जॉगिंग ट्रॅक आहे. त्यामुळे सकाळी तुम्हाला इथे लोकांची वर्दळ दिसेल. इथे एक सुंदर पार्क आहे. तुमचा थकवा घालवायचा असेल तर या पार्कमध्ये येऊन तुम्ही आराम करु शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक कलाकारांचं केंद्र असल्यामुळे इथे कलाकारांना आकर्षित करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे ॲम्फिथिएटर… या ॲम्फिथिएटरमध्ये उत्सव, सेलिब्रेट वांद्रे, मैफिली आणि शास्त्रीय नृत्य सादरीकरणासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले कलाकार इथे आपली कला सादर करतात. (bandstand mumbai)

(हेही वाचा – Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय)

त्याचबरोबर आर्टिस्ट्स कोर्ट हे देखील इथल्या आकर्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथे विशेषतः रविवारी कलाकारांचा मेळावा भरलेला असतो. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारांना मानवंदना देण्यासाठी वॉक ऑफ द स्टार्स आहे. या मार्गावर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांचे पुतळे तसेच इतर कलाकारांच्या हाताचे ठसे आणि स्वाक्षरी असलेल्या सुमारे १०० ब्रास प्लेट्स आहेत. हा रस्ता २ किमी लांबीचा आहे. २८ मार्च २०१२ रोजी अभिनेत्री करीना कपूरच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. (bandstand mumbai)

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करीना कपूर, रणबीर कपूर, आमीर खान, सलमान खान, कतरीना कैफ, प्रियंका चोप्रा असे अनेक कलाकार बॅंडस्टॅंडमध्ये राहतात. तुम्हाला त्यांची घरे देखील लांबून पाहता येतील. मग मुंबईत आलात, तर बॅंडस्टॅंडला भेट द्यायला विसरु नका. (bandstand mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.