Pomegranate benefits : डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

169
Pomegranate benefits : डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर
Pomegranate benefits : डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

अतिशय चविष्ट फळ म्हणून ‘डाळिंब’या फळाचे नाव घेतले जाते. डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. आजाराच्या अनेक समस्यांवर डाळिंब गुणकारी आहे. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस, शौचास साफ न होणे अशा समस्या असतील, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करणे गरजेचे आहे. डाळिंबात फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.याव्यतिरिक्तही डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

रक्ताभिसरण
डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

चिरतरुण राहण्यासाठी
तारुण्य टिकवण्यासाठी रोज एका डाळिंबाचे सेवन करावे.

ताप
ताप आला असेल,तर डाळिंब खावे. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी होते.

अपचन
अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब खाणे फायदेशीर ठरते.

तोंड येणे, घसा दुखी
घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.

मूळव्याध
मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल, तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून सेवन करावे. यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाच्या सालीचा रस घ्यावा.

शरीर मजबुतीसाठी
शरीर मजबूत,काटक आणि सुंदर बनवण्यासाठी डाळिंबाचा रस आणि आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी. आठ दिवस उन्हात ठेवावे. तयार झालेले सरबत दररोज 1 कप प्यावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.