अभिनेता सोनू सूदने केले ‘सेवा विवेक संस्थे’च्या उपक्रमांचे कौतुक!

89

अभिनेता सोनू सूदने सेवा विवेक संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे. सेवा विवेक संस्थेच्या राजकुमारी गुप्ता यांनी अभिनेता सोनू सूद यांची ऊसगाव, विरार येथे भेट घेतली. चित्रीकरणासाठी आलेल्या अभिनेता सोनू सूद यांनी सेवा विवेकच्या सामाजिक कार्याची माहिती समजून घेऊन संस्थेच्या कामाचे कौतुक केले. त्यांना सेवा विवेक संस्थेचे माहितीपत्रक व आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेद्वारे तयार केलेल्या वस्तू भेट देण्यात आल्या.

( हेही वाचा : पोस्टमन आणून देतात पैसे, पोस्टाची ‘ही’ योजना माहिती आहे का? )

New Project 2 4

सेवा विवेक सामाजिक संस्था आदिवासी महिलांना सन्मान व रोजगार मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यात अनेक वर्षे काम करत आहे. संस्थेतल्या बऱ्याच महिला या संस्थेत काम करण्याआधी, या महिलांचे रोजगाराचे साधन केवळ शेतीकाम व घरकाम एवढेच होते. सेवा विवेक संस्थेसोबत जोडल्या गेल्यानंतर महिलांनी बांबूपासून बनणाऱ्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रशिक्षण घेतले, हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या कच्चामालाद्वारे उत्तम दर्जेदार वस्तू तयार करणे यात महिलांनी हातखंड मिळवला आहे. त्यामुळेच त्यांनी बनवलेल्या वस्तूंना देशभरातून मागणी असते. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच महिला आपल्या मुलांचे शिक्षण तसेच घरातील विविध जबाबदाऱ्या सुद्धा स्वीकारू लागल्या आहेत. सेवा विवेक या संस्थेच्या प्रयत्नांमुळे या महिलांना घरात तसेच त्यांच्या गावात सुद्धा सन्मान मिळू लागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.