पोस्टमन आणून देतात पैसे, पोस्टाची ‘ही’ योजना माहिती आहे का?

115

आपण कधी बॅंकेचे पासबुक विसरतो, कधी एटीएम कार्ड विसरतो, तर कधी पाकीट चोरीला जाते. नेमकी अशाचवेळी पैशांची गरज भासते. ही अडचण ओळखून पोस्टाने एक योजना आणली आहे. आधार क्रमांक आधारित पेमेंट सिस्टिम अंतर्गत बॅंक खात्याशी आधार कार्ड संलग्न असलेल्या व्यक्तिला हातांच्या ठशांच्याआधारे पोस्टातून किंवा पोस्टमनकडून दहा हजारांची रक्कम घेता येते.

या योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत 1 हजार 603 कोटी रुपयांचे 48.16 लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत.

काय आहे योजना?

  • अडीअडचणीला पोस्टातून, पोस्टमनकडून पैसे घेता येतात.
  • आधारशी संलग्न बॅंकखाते असलेल्यांना सेवेचा लाभ घेता येतो.
  • खात्यातून पैसे काढणे, शिल्लक रकमेची चौकशी करता येते.

( हेही वाचा: Mhada Lottery 2022: म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ? आता किती असणार डिपॉझिट? )

ठसे द्या, पैसे घ्या

  • पैसे काढण्यासाठी ग्राहकाला हाताच्या बोटांचे ठेस द्यावे लागतात.
  • यासाठी ग्राहकाकडे आधार क्रमांक असणे गरजेचे असते.
  • ग्राहकाला दिवसाला जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढता येतात.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.